या राशीच्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागणार

On: June 20, 2024 7:36 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल. संभाषण कौशल्य दाखवण्याचा योग्य येईल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील. शुभ अंक ६, शुभ रंग पिवळा

वृषभ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. घरगुती कामाचा ताण जाणवेल. शुभ अंक ४, शुभ रंग काळा

मिथुन:- भावंडांची मदत घेता येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. अधिकार्‍यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. शुभ अंक २, शुभ रंग हिरवा

कर्क:- कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातून चांगला धनलाभ संभवतो. किरकोळ गैरसमज दूर सारावेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. शुभ अंक ७, शुभ रंग नारंगी

सिंह:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक अडचणीतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. अपचनाचा त्रास जाणवेल. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

कन्या:- काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका. शुभ अंक ३, शुभ रंग जांभळा

Today Horoscope l तूळ:- जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील. जुगाराची आवड पूर्ण कराल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

वृश्चिक:- हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल. विरोधकांचा विरोध मावळेल अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक समाधान शोधा. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा

धनू:- आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल. शुभ अंक ७, शुभ रंग लाल

मकर:- हातातील कामात किरकोळ अडचणी संभवतात. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा. जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल. शुभ अंक ९, शुभ रंग पोपटी

कुंभ:- गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका. खिशाला कात्री लागू शकते. जोडीदाराचे मत विचारात घ्या. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. शुभ अंक ६, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l मीन:- जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील. तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. कामातून समाधान मिळेल. शुभ अंक २, शुभ रंग पांढरा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

कोणी 22 वर्षांचा तरूण तर कोणी घरचा कर्ता, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर 4 समर्थकांनी आयुष्य संपवलं

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आक्रमक; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा

अजित पवारांना मोठा धक्का?, ‘हा’ आमदार परतीच्या वाटेवर?

“मनोज जरांगे आणि भुजबळ यांनी एकत्र यावं”

मोठी बातमी! आणखी एका भयंकर अपघाताने पुणे हादरलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now