आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात सावधानता बाळगावी

On: June 17, 2024 7:55 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- एखादे चांगले काम होईल. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा

वृषभ:- हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे. अरबट-चरबट खाऊ नका. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. गोड बोलून कार्यभाग साधाल. शुभ अंक २, शुभ रंग लाल

मिथुन:- प्रसन्नता पूर्वक दिवसाची सुरुवात होईल. अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. दिवस चांगला जाईल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

कर्क:- मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणूकीपासून सावध राहावे. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. शुभ अंक १, शुभ रंग काळा

Today Horoscope l सिंह:- चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

कन्या:- कामाची धांदल उडेल. आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. शुभ अंक ७, शुभ रंग पांढरा

तूळ:- धार्मिक अनुष्ठान साधाल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. प्रवासात सावधानता बाळगावी. शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा

वृश्चिक:- नातलगांची गाठ पडेल. तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. मित्रांना दुखावून चालणार नाही. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा

धनू:- मुलांच्या सौख्यात आनंद मानाल. जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

मकर:- तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. शुभ अंक २, शुभ रंग लाल

कुंभ:- नवीन कामे अंगावर येतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l मीन:- कामात चांगली सफलता मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

दान करते वेळी ‘या’ गोष्टी ठेवाव्या लक्षात, नाहीतर लागाल भिकेला

पुण्यात हादरून टाकणारी घटना, पत्नीला लॉजवर नेत पतीनेच केलं असं काही की..

‘एवढा जीव मला कुणीच लावला नाही’; वायबसे कुटुंबियांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंना अश्रू अनावर

भारतीयांसाठी खूशखबर!!!, सौरभ नेत्रवलकर भारतात येऊन T20 वर्ल्डकप खेळणार

“नाद फक्त तुमचाच”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘तो’ व्हिडिओ तूफान व्हायरल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now