आज शनीदेव या राशींच्या आयुष्यात बदल घडवणार; मिळणार गोड बातमी

On: June 15, 2024 7:22 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- हातून एखादे चांगले काम होईल. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. जुन्या मित्रांसोबत दिवस मजेत घालवाल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. उत्तम कौटुंबिक सौख्य मिळेल. शुभ अंक ६, शुभ रंग हिरवा

वृषभ:- हाती घेतलेल्या कामाकडे आधी लक्ष द्यावे. अरबट-चरबट खाऊ नका. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. दिवसभर काहींना-काही काम मागे राहील. गोड बोलून कार्यभाग साधाल. शुभ अंक २, शुभ रंग लाल

मिथुन:- प्रसन्नता पूर्वक दिवसाची सुरुवात होईल. अधिक उत्साहाने कामे कराल. मनमोकळ्या गप्पा मारता येतील. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवाल. आज गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला जाईल. शुभ अंक ९, शुभ रंग पांढरा

कर्क:- मनात अनामिक चिंता निर्माण होईल. भावनेच्या आहारी जाऊ नये. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. शुभ अंक १, शुभ रंग काळा

सिंह:- चांगले मानसिक स्वास्थ लाभेल. आंतरिक सृजनशीलता लाभेल. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी दाटून येईल. जवळचे मित्र भेटतील. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. शुभ अंक ४, शुभ रंग नारंगी

कन्या:- कामाची धांदल उडेल. आपल्याला सातत्याची गरज भासेल. वेळ आणि काम यांचा मेळ घालावा. स्वत:च्या फायद्याकडे अधिक लक्ष द्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. शुभ अंक ७, शुभ रंग पांढरा

तूळ:- धार्मिक अनुष्ठान साधाल. परोपकारातून परमार्थ साधता येईल. कमी श्रमातून अधिक फायद्याचा विचार कराल. गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा

वृश्चिक:- नातलगांची गाठ पडेल. तुमच्यातील क्रोधाला खतपाणी घातले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा लागेल. चटकन कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. मित्रांना दुखावून चालणार नाही. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l धनू:- मुलांच्या सौख्यात आनंद मानाल. जुनी कामे नव्याने अंगावर येतील. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. सुरस भोजनाची प्राप्ती होईल. जोडीदाराकडून समाधान मिळेल. शुभ अंक ९, शुभ रंग निळा

मकर:- तब्येतीच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक व्यवहारात लक्ष घालाल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. इतरांचा विश्वास संपादन करावा. शुभ अंक २, शुभ रंग लाल

कुंभ:- नवीन कामे अंगावर येतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. दिवस गप्पा-गोष्टींमध्ये घालवा. आपल्या मनातील गुज मोकळेपणाने सांगावे. फक्त शब्दांची धार लक्षात घ्यावी. शुभ अंक ८, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l मीन:- कामात चांगली सफलता मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होईल. पत्नीशी मतभेदाची शक्यता. मुलांचे विचार जाणून घ्यावेत. घाईने केलेले काम चुकू शकते. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

लंके-मारणेच्या भेटीवरून राजकारण तापलं; रोहित पवारांनी मागितली माफी

शिंदे सरकारची मोठी घोषणा, वारीतील प्रत्येक दिंडीला मिळणार ‘इतके’ हजार रूपये

‘इतका निस्वार्थी भावना असणारा’; तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी खास पोस्ट

घरातून बाहेर पडताना काळजी घ्या; ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ; EPFO ने बंद केली ‘ही’ सुविधा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now