Today Horoscope l मेष:- छोट्याश्या गोष्टींनी नाराज होऊ नका. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव मनात जागृत ठेवा. सर्वांशी गोडीने वागाल. कोणत्याही प्रकारचा उतावीळपणा करू नका. कामाची अचूक आखणी करावी. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा
वृषभ:- तुमच्यातील प्रतिभा जागृत ठेवा. मुलांबाबत शंका मिटतील. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. उत्तम वाहन सौख्य लाभेल. गुरुकृपेचा लाभ घेता येईल. शुभ अंक ८, शुभ रंग निळा
मिथुन:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. सतत कार्यमग्न राहाल. खिशाला कात्री लागू शकते. लहान-सहान कामासाठी धावपळ होईल. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ अंक ६, शुभ रंग जांभळा
कर्क:- मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य संधीची वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. काहीसे हट्टीपणाने वागाल. नवीन लोक संपर्कात येतील. शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी
सिंह:- उष्णतेचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. मनातील योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. आजचे काम उद्यावर ढकलू नका. जबाबदारी निभावून नेता येईल. राजकरणात एक पाऊल पुढे टाकाल. शुभ अंक ५, शुभ रंग पोपटी
Today Horoscope l कन्या:- प्रवासातील क्षुल्लक अडचणी टाळाव्यात. पाय खेचणार्या लोकांकडे लक्ष ठेवावे. अपचनाचा त्रास जाणवेल. कामातील तांत्रिक बाजू लक्षात घ्याव्यात. प्रलोभनाला भुलू नका. शुभ अंक ७, शुभ रंग निळा
तूळ:- आरोग्याकडे लक्ष ठेवावे. नवीन गुंतवणुकीला वाव मिळेल. अनाठायी खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रेस जुगारा पासून दूर राहावे. शुभ अंक ३, शुभ रंग लाल
वृश्चिक:- जोडीदाराशी मतभेदाची शक्यता आहे. घरातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. प्रवास जपून करावा. घरगुती कामात अधिक वेळ अडकून पडाल. आर्थिक गणित नव्याने मांडावे लागेल. शुभ अंक २, शुभ रंग काळा
धनू:- हातातील अधिकार योग्य ठिकाणी वापरा. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्यात काहीशी सुधारणा संभवते. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. मनातील अरसिकता काढून टाकावी. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी
मकर:- कामानिमित्तचा प्रवास सावधानतेने करावा. जोडीदाराशी मतभेद संभवतात. रागावर नियंत्रण ठेवावे. भागीदारीच्या व्यवसायात सबुरी बाळगावी. तिखट व तामसी पदार्थ खाल. शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा
कुंभ:- पित्त विकाराचा त्रास संभवतो. क्षुल्लक कारणाने डोकेदुखी वाढू शकते. घाईघाईने कोणतेही काम करू नका. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. नवीन लोकांच्यात मिसळावे. राजकीय क्षेत्रात विजयाचा तुरा रोवाल. शुभ अंक ९, शुभ रंग गुलाबी
Today Horoscope l मीन:- सामुदायिक वादापासून दूर राहावे. मुलांच्या गोष्टी विरोधी वाटू शकतात. मानसिक चंचलता जाणवेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. अनाठायी खर्च टाळावा. शुभ अंक ६, शुभ रंग काळा
News Title –Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
“…म्हणून आम्ही राज ठाकरेंना सोबत घेतलं”; मोदींनी सांगितलं कारण
“राजकारणी आहात की गावगुंड, अजित पवारांना निवडणूक जड जाणार”
नुडल्स खाणं जीवावर बेतलं, धक्कादायक घटना समोर
महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
“चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, तेरे नाम भांग पाडून फिरत असतात”






