Today Horoscope l मेष:- ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील. आजचा दिवस आनंददायी ठरेल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. मौजमजेत वेळ घालवाल. कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी
वृषभ:- शांत चित्ताने कामे करावीत. कलहाचे प्रसंग टाळावेत. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूंवर मात करता येईल. कामात मन रमेल. शुभ अंक २, शुभ रंग पिवळा
मिथुन:- शब्दाने शब्द वाढवू नका. वैचारिक ताण घेऊ नका. बौद्धिक हटवादीपणा टाळावा. बोलतांना संयम सोडू नका. चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा. शुभ अंक ९, शुभ रंग निळा
कर्क:- गोड बोलून कामे करून घ्याल. घरातील वातावरण खेळकर राहील. घरगुती कामात अधिक वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा. शुभ अंक ८, शुभ रंग काळा
सिंह:- मनातील इच्छाशक्ति प्रबळ ठेवा. आज बरीच कामे हातावेगळी करता येतील. यश पदरात पडून घ्याल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. भावंडांचे प्रेमळ सौख्य वाढेल. शुभ अंक ६, शुभ रंग पिवळा
कन्या:- कामात धरसोडपणा करू नका. दिवसभर कामाची धांदल राहील. कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा लागेल. इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा
तूळ:- मनात हेतु ठेवून कामे कराल. मोठ्या योजनांची आखणी कराल. मनाच्या मर्जीला अधिक महत्त्व द्याल. दिवस चैनीत घालवाल. आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. शुभ अंक ३, शुभ रंग लाल
वृश्चिक:- सडेतोड उत्तरे द्याल. दिवस काहीसा धावपळीत जाईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. येणी वसूल करावी लागतील. काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल. शुभ अंक ५, शुभ रंग नारंगी
Today Horoscope l धनू:- माणसे ओळखून वागावे. अध्यापक वर्ग दिवसभर कामात गर्क राहील. नोकरदार वर्गाला लाभ होईल. व्यापार्यांना चांगला लाभ मिळवता येईल. अधिकारात वाढ होईल. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा
मकर:- कामाची योग्य रूपरेखा ठरवावी. सहकार्याने कामे करावीत. हातातील अधिकार वापरता येतील. स्वावलंबनाची कास धरावी. पोटाचे त्रास संभवतात. शुभ अंक ६, शुभ रंग पांढरा
कुंभ:- लोक निंदेला घाबरू नका. अति शिस्तीचा बडगा करू नका. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे. भडक शब्दांचा वापर टाळावा लागेल. शुभ अंक २, शुभ रंग गुलाबी
Today Horoscope l मीन:- हित शत्रूंवर मात करू शकाल. अचानक धनलाभाची शक्यता. नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी. पित्त विकारांचा त्रास संभवतो. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळावीत. शुभ अंक ८, शुभ रंग निळा
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
‘बजरंग सोनवणेंचा अजितदादांना फोन’, अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ
जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती, आमदार, खासदार जरांगेंच्या भेटीला
काँग्रेस अन् ठाकरे गटात वादाची ठिणगी; ठाकरेंनी नाना पटोलेंचा फोन घेणं टाळलं?
गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅम सोनं फक्त…
“..तर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू”; नीट परीक्षेतील गोंधळावरून मनसेचा गंभीर इशारा






