दसऱ्याला ‘या’ राशींवर होणार धन-सुखाची बरसात, मिळणार अमाप पैसा!

On: October 12, 2024 7:44 AM
Dussehra 2024
---Advertisement---

Today Horoscope | आज 12 ऑक्टोबरला अश्विन शुक्ल पक्षातील उदया तिथी नवमी आणि शनिवार आहे. नवमी तिथी आज सकाळी 11 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल. आज नवमी तिथीला विजयाचे प्रतीक असलेला ‘दसरा आणि विजयादशमी’ हा सणही साजरा केला जाईल. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. आज दसऱ्याच्या शुभदिनी कोणत्या राशींवर सुखाची बरसात होणार आणि कोणाच्या पदरात पडणार निराशा जाणून घेऊयात. (Today Horoscope )

आजचे राशी भविष्य

मेष रास : खूप दिवसांपासून असलेले वाद आज संपुष्टात येतील. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कोणत्याही वादापासून दूर राहावे. आज मोठी खरेदी कराल.

वृषभ रास : आज तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस येतील. सर्व अडचणींवर मात कराल. प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. (Today Horoscope )

मिथुन रास : नवीन व्यवसाय उभारण्यासाठी तुम्हाला आर्थिक मदत मिळेल.  कुटुंबियांची उत्तम साथ मिळेल. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्याच्या समस्या देखील या काळात दूर होतील.

कर्क रास : कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. तुमचे कौतुक होईल. घरात आनंदी वेळ व्यतीत कराल. आवडत्या व्यक्तीसाठी खरेदी कराल. आजचा दिवस प्रसन्न जाईल.

सिंह रास : नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस छान जाईल.

कन्या रास : व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल. आजचा दिवस धावपळीमध्ये जाईल. (Today Horoscope )

तूळ रास : जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.

वृश्चिक रास : तुमचे अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. तुम्हाला आज मोठा धनलाभ होईल. यामुळे दिवसभर प्रसन्न राहाल. जवळचा प्रवास घडेल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील.

धनू रास : आज आवडत्या गोष्टींची खरेदी कराल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा असेल. तुमची एखादी मोठी डील पक्की होईल. यामुळे आनंदी राहाल.

मकर रास : आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल. प्रवासात घाई करून चालणार नाही. (Today Horoscope )

कुंभ रास : आयुष्यातील दुःख, अडचणी दूर होतील. तुमच्यावर सुखाचा वर्षाव होईल. कुटुंबातील वाद संपतील. आज दिवसभर प्रसन्न राहाल. मन आनंदी राहील. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.

मीन रास : घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. नव्या योजनेत गुंतवणूक कराल.

News Title : Today Horoscope 12 October 2024 

महत्वाच्या बातम्या –

लाडक्या बहीण योजनेत मुदतवाढ! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

नवीन अपडेट्ससह KTM बाईक लाँच; जाणून घ्या किंमत

रतन टाटा यांचा वारसदार ठरला! ‘या’ व्यक्तीवर सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील तीन संशयित ताब्यात

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं; ‘या’ बड्या आमदाराची इच्छा

Join WhatsApp Group

Join Now