या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी

On: July 2, 2024 7:56 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- सांपत्तिक दर्जा सुधारेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. मनातील जुन्या इच्छा पूर्ण कराल. समाज कार्यात हिरीरीने भाग घ्याल. उत्तम गुंतवणुकीचा मार्ग निवडाल. शुभ अंक १, शुभ रंग लाल

वृषभ:- प्रत्येक गोष्टीत आनंदाने रस घ्याल. कपडे-लत्ते खरेदी कराल. महिला नटण्या मुरडण्याची हौस भागवतील. चार चौघांत मिळून मिसळून वागाल. वैवाहिक सौख्यात न्हाऊन निघाल. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

मिथुन:- मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतील. शुभ अंक ४, शुभ रंग केशरी

कर्क:- मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. जिथे जाल तिथे आनंद निर्माण कराल. कामातील गतीमानता वाढेल. वरिष्ठांची शाबासकी मिळवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. शुभ अंक ६, शुभ रंग निळा

सिंह:- तुमचे कला गुण इतरांच्या समोर येतील. सर्वांच्या कौतुकाच्या विषय बनाल. व्यापारात चांगला फायदा होईल. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. बाहेरील अन्न पदार्थ टाळावेत. शुभ अंक ४, शुभ रंग पांढरा

Today Horoscope l कन्या:- आवडते साहित्य वाचाल. विशाल दृष्टिकोन ठेवाल. आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामात प्रगतीला वाव आहे. नवीन अनुभव गाठीशी बांधता येतील. शुभ अंक २, शुभ रंग पिवळा

तूळ:- कमी श्रमातून धनलाभ संभवतो. जोडीदाराची बौद्धिक बाजू दिसून येईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही कामे वेळे आधीच पूर्ण होतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. शुभ अंक ५, शुभ रंग केशरी

वृश्चिक:- स्वकर्तृत्वावर कामे मिळवाल. काही गोष्टींचे चिंतन करावे. भावंडांचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील नैराश्य बाजूला सारावे. प्रवासात खबरदारी घ्यावी.- शुभ अंक ८, शुभ रंग लाल

धनू:- कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे. स्थावरची कामे पार पडतील. शक्यतो मोजक्या शब्दांत मत मांडा. डोळ्यांची काळजी घ्यावी. शुभ अंक १, शुभ रंग तांबडा

मकर:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घ्याल. रेस जुगारातून धनलाभ संभवतो. संभाषणाची आवड पूर्ण कराल. तुमचे मत योग्य ठरेल. शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी

कुंभ:- कला गुण जोपासण्याचा प्रयत्न करावा. मनात उगाचच चिंता सतावेल. जामीनकीचे व्यवहार सावधगिरीने करावेत. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती वातावरणात रमून जाल. शुभ अंक ३, शुभ रंग हिरवा

Today Horoscope l मीन:- एकांगी विचार करू नका. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक कराल. गुंतवणुकीचे नवीन मार्ग शोधाल. कर्तव्याची जाणीव योग्य प्रकाराने बजावाल. मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. शुभ अंक ७, शुभ रंग पांढरा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या- 

विधानपरिषदेत राडा; दानवेंनी प्रसाद लाडांना दिली शिवी, म्हणाले ‘ए मा****’

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट

मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी

‘या’ भागात पावसाने घातलं थैमान, रस्त्यावर अचानक मगरी आल्याने भीतीचं वातावरण

राहुल गांधींचं हिंदुंबाबत धक्कादायक वक्तव्य; पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now