चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?

On: July 3, 2024 10:51 AM
Gold Silver Rate
---Advertisement---

Gold Silver Rate l सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी म्हणजेच जीन महिन्यात ग्राहकांना सोन्याच्या व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र आज पुन्हा एकदा या दोन्ही धातूंच्या किमतीत चढ पाहायला मिळत आहेत.

सोन्याने मारली मुसंडी :

जून महिन्यात सोने व चांदी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला देखील सोने नरमले होते. तर चांदी चांगलीच चमकली होती. मात्र आता या दोन्ही धातूंनी दरवाढ केली आहे. खरतरं या महिन्याच्या अखेरीस बजेट 2024 सादर होणार आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती महागणार की, स्वस्त होणार याकडे ग्राहकांच व गुंतवणूकदारांच लक्ष लागल आहे.

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या किंमतीत दरवाढ झाली होती. मात्र जून महिन्यात किंमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात नरमाई दिसून येत होती. तसेच 2 जुलै रोजी म्हणजेच काल सोने 110 रुपयांनी वधारले होते. मात्र आज सकाळच्या सत्रात सोन्याने दरवाढीचे संकेत देखील दिले आहेत. आज 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Silver Rate l चांदीची हजाराची मारली उडी :

या आठवडाभरात चांदीच्या किंमतीत जास्त फरक झालेला नाही. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने उसळी घेतली आहे. तर या महिन्याच्या सुरवातीला म्हणजेच 1 जुलै रोजी चांदी 200 रुपये तर 2 जुलै रोजी 800 रुपयांनी चांदी वधारली आहे. त्यानुसार एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आहे तर चांदी उतरली आहे. आज 24 कॅरेट सोने 71,692 रुपये आहे, तर 23 कॅरेट 71,405 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोने 65,670 रुपये झाले आहे. याशिवाय 18 कॅरेट 53,769 रुपये आहे, तर 14 कॅरेट सोने 41,940 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव 88,015 रुपये झाला आहे.

News Title : Today Gold Silver Rate

महत्त्वाच्या बातम्या-

तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं आहे का? हे तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या एका क्लिकवर

पाणीपुरीवर येणार बंदी; ‘या’ सर्वात मोठ्या आजाराचा धोका

सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता

अखेर करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनबदल केला मोठा खुलासा….

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now