Today Gold Price | गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना अखेर वर्षअखेरीस ब्रेक लागला आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. अखिल भारतीय सराफ संघाच्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावरून खाली आला आहे.
मागील सत्रात सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख 42 हजार 300 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र आता नफा वसुलीमुळे दरात घट झाली असून सोनं पुन्हा स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येत आहे. (Gold Price Today India)
IBJA नुसार आजचे सोन्याचे दर :
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 41 हजार रुपयांवर आला आहे. 23 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 36 हजार 233 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 25 हजार 291 रुपये नोंदवण्यात आला आहे. (10 Gram Gold Rate)
18 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 1 लाख 2 हजार 586 रुपयांवर व्यवहार करत असून 14 कॅरेट सोन्याचा दर 80 हजार 17 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत घसरण झाली असून प्रति औंस दर 4,462.96 डॉलरवर आला आहे.
Today Gold Price | वायदा बाजार आणि पुढील अंदाज :
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी 2026 डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव किरकोळ वाढीसह 1 लाख 40 हजार 230 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर कॉमेक्सवर सोन्याच्या वायदा दरात मर्यादित वाढ दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही घसरण मुख्यतः व्यापाऱ्यांच्या नफा वसुलीमुळे झाली आहे. (Today Gold Price)
कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती, फेडरल रिझर्व्हचे धोरण आणि रुपया-डॉलर विनिमय दर यावर पुढील काळात सोन्याच्या किमती अवलंबून राहतील. 2026 मध्ये सोन्याच्या किमतीत 5 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून गुंतवणूकदारांनी उच्च दर लक्षात घेऊन सावध आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे.






