Today Gold Price | गणेशोत्सवाच्या अगोदरच सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज, गुरुवार 21 ऑगस्ट 2025 रोजी सोनं पुन्हा ₹500 ने स्वस्त झालं आहे. त्यामुळे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. (Today Gold Price Rate )
प्रमुख शहरांतील दर :
देशातील बहुतेक शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1 लाखांच्या पुढे गेला आहे, तर 22 कॅरेट सोनं मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे सुमारे ₹92,300 प्रति 10 ग्रॅम नोंदवलं गेलं आहे. चांदीच्या दरात मात्र किरकोळ वाढ झाली असून ती ₹1,12,610 प्रति किलो या पातळीवर पोहोचली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये 0.23% घट नोंदली गेली आहे आणि भाव ₹99,080 प्रति 10 ग्रॅम झाला आहे. जागतिक बाजारातही सोन्याचे भाव दबावाखाली असून, यूएस स्पॉट गोल्ड 0.1% ने घसरून $3,341.93 प्रति औंसवर पोहोचले आहे. डिसेंबर डिलिव्हरीसाठीचे यूएस फ्युचर्स $3,384.40 प्रति औंसवर स्थिरावले आहेत.
Today Gold Price | सोन्यातील गुंतवणुकीचे परतावे :
गेल्या तीन वर्षांत सोन्याने गुंतवणूकदारांना सरासरी 23% वार्षिक परतावा दिला आहे, जो निफ्टी 50 निर्देशांकाच्या 11% परताव्यापेक्षा दुप्पट आहे. 2024 मध्ये सोन्यात 27% पेक्षा जास्त वाढ झाली, तर निफ्टी 50 ने फक्त 8.8% कामगिरी केली होती. जुलै 2025 पर्यंत कॉमेक्स गोल्डने तब्बल 28.68% परतावा दिल्याची आकडेवारी समोर आली आहे. (Today Gold Price)
सध्या गुंतवणूकदार अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन हॉल परिषदेत होणाऱ्या भाषणाकडे लक्ष ठेवून आहेत. महागाई नियंत्रणासंदर्भातील पावले आणि रोजगार बाजाराला चालना देण्यासाठी काय उपाययोजना होतात, याचा परिणाम जागतिक सोन्याच्या भावांवर दिसू शकतो. सप्टेंबर महिन्यात फेडकडून व्याजदरात 0.25% कपात होण्याची अपेक्षा आहे.






