‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील प्रसिद्ध अभिनेता 4 दिवसांपासून बेपत्ता; शेवटच्या पोस्टमुळे खळबळ

On: April 27, 2024 9:48 AM
TMKOC fame Gurucharan Singh Aka Roshan Singh Sodhi missing
---Advertisement---

TMKOC | सोनी सबवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे चाहते संपूर्ण भारतात दिसून येतात. यामधील प्रत्येक कलाकारांचा एक वेगळा फॅनडम आहे. आता चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मालिकेमध्ये रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारत ज्या अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं तो अभिनेता गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रोशन सिंग सोढी भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग अचानक गायब झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून आता त्याचा शोध घेण्यात येत आहे. गुरुचरण सिंग याच्या वडिलांनी त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. गुरुचरण बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये आणि कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

4 दिवसांपूर्वी गुरुचरण सिंग याने वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियावर त्याने याचा व्हिडीओ देखील टाकला होता. अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वडिलांसोबत खास व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोढीचा शेवटचा मेसेज कुणाला?

22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी गुरुचरण सिंग घरातून निघाला होता. मात्र, तो मुंबईला पोहोचलाच नाही.तसंच दिल्लीतील आपल्या घरीदेखील तो आला नाही. विमानतळावर अधिक माहिती घेतली असता गुरुचरण सिंह विमानात बसलाच नसल्याची माहिती समोर आली. यामुळे अजूनच चिंता वाढली आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आता अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.गुरुचरण सिंहचे वृद्ध आई-वडील सातत्याने त्याचा शोध घेत होते. मात्र, अखेर त्यांनी आपला मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार पोलिसांत दिली.

सोढीने TMKOC मालिका सोडली होती?

मालिकेत काम केल्यानंतर मानधन उशिराने मिळत असल्यामुळे गुरुचरण सिंग याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत खुद्द अभिनेत्याने मालिका सोडण्याचं कारण सांगितलं होतं. त्या सुमारास त्याच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याशिवाय, खासगी आयुष्यातही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागत होती. असं गुरुचरण सिंग याने सांगितलं होतं.

News Title – TMKOC fame Gurucharan Singh Aka Roshan Singh Sodhi missing

Join WhatsApp Group

Join Now