TMKOC | सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये ‘दयाबेन’ ही भूमिका प्रेक्षकांना आजही स्मरणात आहे. दयाबेनचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मालिकेत या भूमिकेतील पात्र दिसलंच नाहीये.चाहते अजूनही दयाबेनच्या परतण्याची वाट बघत आहेत.
अभिनेत्री दिशा वकानी या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारत होती.मात्र बाळंतपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला. तिला मालिका सोडून आता बरीच वर्ष झाली आहेत.मात्र,दिशा वकानी अजूनही परतली नाही. दिशाला मालिकेत पुन्हा आणण्याचे अनेक प्रयत्न निर्मात्यांकडून झाले.
दिशा वकानी मालिकेत परतणार?
मात्र तिने कुटुंबीयांना प्राधान्य देत मालिकेत परतण्यास नकार दिला. प्रेक्षक दयाबेनच्या कमबॅकची आतुरतेने वाट बघत आहेत. अशात रोशन भाभीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने सर्वांत मोठा खुलासा केलाय. तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दयाबेनच्या (TMKOC ) भूमिकेविषयी मोठा खुलासा करताना दिसतेय.
मालिकेचे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी गेल्या तीन वर्षांपासून एका मुलीचं ऑडिशन घेत असल्याचं जेनिफरने म्हटलं आहे.“ती 100 टक्के दया आहे. एका मुलीचं ते तीन वर्षांपासून ऑडिशन घेत आहेत. दिल्लीवरून तिला इथे बोलवतात. एक गोष्ट म्हणजे ती मुलगी तरुण आहे. ती 28-29 वर्षांची आहे. त्यामुळे वयातील फरक लगेच दिसून येईल. म्हणून तिची निवड होऊ शकत नाहीये. पण ती हुबेहूब दयासारखीच आहे.”, असं जेनिफर मिस्त्रीने (Actress Jennifer Mistry) सांगितलं आहे.
रोशन भाभी उर्फ जेनिफर मिस्त्रीचा मोठा खुलासा
पुढे बोलताना (TMKOC )ती म्हणाली की, “आमची तिच्यासोबत मॉक टेस्ट झाली होती. दिलीपजी आणि टप्पू सेना यांचंही वेगवेगळं मॉक शूट झालं. त्या मुलीचा चेहरा वेगळा आहे, पण तयारी केल्यावर तुम्ही डोळे बंद कराल तेव्हा तुम्ही फरकच सांगू शकणार नाही.” अशी माहिती जेनिफर मिस्त्रीने दिली आहे.
या सर्व खुलाश्यातून सध्या तरी हेच स्पष्ट होतंय की, दयाबेन अर्थातच दिशा वकानी या मालिकेत पुन्हा परतणार नाही. कारण, निर्माते तिच्या भूमिकेसाठी अजूनही अभिनेत्रीचा शोध घेत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून मालिकेचे निर्माते दिशा वकानी हीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकसुद्धा तिला परत आणण्याची जोरदार मागणी करत आहेत. आता पुढे काय होणार, ते पाहावं लागेल.
News Title – TMKOC fame Disha Vakani To Be Replaced with another actress
महत्त्वाच्या बातम्या-
पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी!, भाजपच्या 3 नेत्यांवर गुन्हा दाखल
ईव्हीएम मशीनबाबत किरण मानेंची पोस्ट व्हायरल, म्हणाले…
बारामतीत EVM ठेवलेल्या रुमचे CCTV 45 मिनिटं बंद; शरद पवार गटाकडून गैरप्रकार घडल्याची शंका
धक्कादायक! पुण्यात बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान तर जिवंत मतदाराला दाखवलं मृत






