Tips for Whitening Teeth | आपल्या चेहऱ्याचा रंग किंवा चेहऱ्याची रचना आपल्याला सुंदर बनवत नाही. तर, आपल्या चेहऱ्यावरचे गोड हास्य आपल्याला सुंदर बनवत असते. मात्र, बऱ्याच जणांचे दात हे पिवळे असतात. मग, जेव्हा असे व्यक्ती हसतात तेव्हा त्यांचं सौंदर्य यामुळे फिके पडून जाते. इतकंच नाही तर, चारचौघांत त्यांचं हसू देखील होतं. त्यामुळे या लेखात पिवळे दात पांढरे कसे होतील, याचा एक रामबाण उपाय सांगण्यात आलाय. (Tips for Whitening Teeth)
या लेखात तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुमचे दात हिऱ्यासारखे चमकतील. मीठ हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जेवणात मीठ आवश्यक घटक आहे. याशिवाय जेवण बनवणे जवळपास अशक्य आहे. ( ज्यांना हाय ब्लड प्रेशर असेल त्यांना याचे नियम वेगळे असू शकतात.) हेच मीठ दात पांढरे करण्यास महत्वाची भूमिका बजावणार आहे.
मीठाने दात स्वच्छ केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. यामुळे दात चमकदार आणि हिरड्या निरोगी राहतात. शिवाय मीठ तोंडाची पीएच पातळी राखते. ज्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया जमा होत नाहीत. आता मीठाचा वापर करून दातांचा पिवळेपणा कसा घालवायचा याबाबत जाणून घेऊयात.
दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठीचा उपाय
मीठ आणि लिंबाचा रस : लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते. जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. दातांचा पिवळेपणा साफ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी चिमूटभर मिठात 3-4 थेंब लिंबाचा रस टाका आणि थोडं पानी घाला. याची पेस्ट घेऊन त्याने दात साफ करा. आठवड्यातून दोन-तीनवेळा असं केल्यास तुम्हाला परिणाम दिसून येईल.(Tips for Whitening Teeth)
मीठ आणि मोहरीचे तेल : सर्वप्रथम दोन चिमूट मीठ घ्या. त्यात एक चमचा मोहरी तेल टाका. नंतर हे मिश्रण बोटावर घेऊन दातांवर लावा. आणि दात स्वच्छ करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुमचे दात पांढरे होतील. दातांचा पिवळेपणा कमी होईल.
मीठ आणि आले (अद्रक) : दोन चिमूटभर मीठ घ्या. त्यात आले पावडर टाका. ही पेस्ट दातांवर लावा आणि हळुवार चोळा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होईलच शिवाय दातांचा पिवळेपणा देखील कमी होऊन दात पांढरेशुभ्र होतील. तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा हे करू शकता.(Tips for Whitening Teeth)
News Title – Tips for Whitening Teeth
महत्त्वाच्या बातम्या-
“जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; धर्मवीर-2 ची रिलीज डेट समोर
पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा
कांद्याचे भाव कडाडले! महागड्या कांद्यापासून दिलासा मिळणार का?
रवींद्र जडेजाची दुसऱ्या इनिंगला सुरुवात! ‘या’ राजकीय पक्षात एन्ट्री
मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?






