‘या’ स्टार खेळाडूंची आयपीएल लिलावात किंमत घसरली

On: December 23, 2022 7:35 PM
---Advertisement---

मुंबई| आयपीएल(IPL) लिलाव केरळमध्ये सुरू झाला आहे. या लिलावता गेल्या हंगमापेक्षा अनेक बदल झाल्याचे दिसत आहे. त्यातच काही स्टार खेळाडूंची(Cricketrs) किंमत या लिलावात घसरली आहे.

अजिंक्य राहणेला(Ajinkya Rahane) गेल्या वर्षीच्या हंगामापेक्षा निम्मेच पैसे मिळाले आहेत. गतवर्षी त्याला केकेआरनं(KKR) एक कोटी रूपये देऊन संघात घेतलं होतं. यावर्षी चेन्नई सुपर किंगनं(CSK) पन्नास लाखात त्याला संघात घेतलं आहे.

मयंक अग्रवालला(Mayank Agarwal) या लिलावात सनरायजर्स हैदाराबाद(Sunrisers Hyderabad) 8.25 कोटी रूपये देत संघात घेतलं आहे. गेल्यावर्षी त्याला 14 कोटी रूपये मानधन मिळालं होतं.

तसेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनलाही गुजरात टायटन्सनं बेस प्राइजवर खरेदी केलंं आहे. गेल्यावर्षी त्याला 14 कोटी रूपयांना सनराझर्स हैदराबादनं घेतलं होतं.

दरम्यान, सगळ्यात महाग सॅम करन(Sam Curran) विकला गेला आहे. तब्बल 18.5 कोटी रूपये देत पंजाब किंग्सने सॅम करनला आपल्या संघात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now