Maharashtra Politics | “ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणार”, निकालाआधीच आलेल्या दाव्याने मोठी खळबळ

On: January 10, 2024 4:04 PM
Maharashtra Politics
---Advertisement---

Maharashtra Politics | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काही वेळातच लागणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह (Maharashtra Politics) संपूर्ण देशाचं लक्ष आहे. याआधी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

वैभव नाईक यांचा खळबळजनक दावा

दोन दिवसांपूर्वीच सगळा निकाल ठरलाय असा दावा वैभव नाईक यांनी केलाय. मी कामानिमित्त मंत्रालयात आलो होतो, मी हे जबाबदारीने बोलतोय. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही अपात्र होणार. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार, असं वैभव नाईक म्हणालेत.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार हे काही लोकांना आधीपासूनच माहित होतं, असा दावा वैभव नाईक यांनी केला. आमच्याविरोधात निकाल आहे असं वैभव नाईक म्हणाले.

नील प्रभू पक्ष प्रतोद म्हणून वैध ठरले होते. त्यांचा व्हीप पहिल्यादिवसापासून आम्ही मानतोय, असं वैभव नाईक म्हणाले. हे सर्व वेळकाढूपणाच धोरण होतं. निर्णय त्यांना द्यायचा नव्हता, असंही त्यांनी सांगितलंय.

Maharashtra Politics | संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजय राऊतांनी देखील गंभीर आरोप केलाय. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमदारांच्या बाबतच्या निकालाचं मॅचफिक्सिंग आधीच झालं आहे. विधानसभा अध्यक्ष आज फक्त औपचारिकता म्हणून निकाल देणार आहेत, असं दावा संजय राऊत यांनी केला आहे.

जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय त्याच्यावर चर्चा होतेय. दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार काम करतंय. जे निर्णय घेतले जात आहेत. त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या- 

LIC Jeevan Kiran Yojna l LIC ची ही भन्नाट योजना देईल बक्कळ पैसा; मिळेल सात पट रिटर्न्स

Rahul Narvekar | “उद्या ते निकाल अमेरिकेतून आणलाय असंही म्हणू शकतात”

MLA Disqualification Case | अपात्रतेचा निकाल कसा असणार?, ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम स्पष्टच बोलले

Aishwarya Rai नेच ‘तो’ सल्ला दिला, अभिषेक बच्चनकडून मोठा खुलासा…

Vijay Sethupathi | अवॉर्ड शोचा किस्सा सांगत विजय सेतूपतीने केला मोठा खुलासा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now