शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! फळपिक विम्याची मुदत राज्य सरकारने वाढवली

On: June 13, 2024 9:05 AM
Farmer
---Advertisement---

Farmer l राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2024-25 व 2025-26 या 2 वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य सरकारने मान्यता दिली आहे अशी माहिती राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या बैठकीत दिली आहे.

पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत काय आहे? :

राज्यात मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसे या पिकांचा विमा भरून शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. ऋतूनुसार या हंगामात राज्यात डाळिंब, मोसंबी, चिकू, संत्रा, पेरू, लिंबू, द्राक्ष, आंबा, पपई, सीताफळ, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष या पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आल्याची माहिती आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी, फ्युचर जनरल, बजाज अलियांज आणि युनिव्हर्सल सोम्पो या चार कंपन्यांच्या मार्फत ही योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. तसेच मृग बहरात द्राक्ष, संत्रा, पेरू, काजू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत 25 जून 2024 ही निश्चित करण्यात आली आहे. तसेच मोसंबी, चिकू 30 जून, तर डाळिंब 14 जुलै याशिवाय सीताफळ पिकासाठी 31 जुलै ही मुदत निश्चित करण्यात आली आहे.

Farmer l कृषी विभागाने अतिरिक्त साठा लवकर मंजूर करावा :

दरम्यान 2024 ते 2026 या दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या फळपिकविमा योजनेचे स्वरूप, विमा संरक्षित रक्कम यांसह सविस्तर माहिती कृषी विभागाकडून जारी देखील करण्यात आली आहे. यामध्ये फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपला विमा भरून घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

याशिवाय राज्यात काही ठिकाणी पाऊस जास्त पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत देखील वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जातो. मात्र येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा बफर स्टॉक करण्यात येत असतो. याशिवाय अतिरिक्त कोटा देखील मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले आहेत.

News Title- The state government has extended the term of fruit crop insurance

महत्त्वाच्या बातम्या-

मला तिकिट मिळू नये, त्यासाठी पक्षातील लोकांनी सुपारी दिली; या खासदाराचा धक्कादायक आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बजरंग सोनावणेंनी आखला पुढील मास्टर प्लॅन

सावधानता बाळगा! आज या राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता

“कदाचित हे माझं शेवटचं उपोषण..”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे हे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाही”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now