Manoj Jarange l मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती खालवली आहे. प्रकृती खालावली असल्याने त्यांनी उपचार घेण्यासाठी पूर्णपणे नकार दिला होता. मात्र आज पहाटेच्या डॉक्टरांचं पथक उपोषणस्थळी पोहोचलं आणि त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांचं नाव शाळेला देण्यात येणार :
मराठा आरक्षण म्हंटल की डोळ्यासोमर येतात ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. राज्यभर मनोज जरांगेची ओळख मराठा आरक्षणाचे नेते म्हणून झाली आहे. त्यांच्या संघर्षमय जीवनावर चित्रपट देखील येत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि मर्द मावळा शिवरायांचा वाघ हे चित्रपट याच महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची संघर्षमय कथा मांडण्यात आली आहे.
अशातच आता मनोज जरांगे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे यांचं नाव शाळांनाही देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगे पाटील यांच नाव देण्याचा ठराव देखील मंजूर झाला आहे. बार्शी तालुक्यात असलेल्या जय जगदंब शिक्षण संस्थेने मुंगशी विद्यालयाला जरांगे पाटील यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर केला आहे.
Manoj Jarange l मनोज जरांगे पाटील यांनी दिली मंजुरी :
बार्शी तालुक्यात असलेल्या जय जगदंब शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घे आहे. त्यानंतर तुमचे नाव शाळेला देण्याची अनुमती मिळावी यासाठी पत्र देखील त्यांना दिले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना नामांकरण सोहळ्याचे निमंत्रण देखील संस्थेनेकडून देण्यात आले आहे. याबाबत मनोज जरांगे यांच्याकडून शिक्षण संस्थेला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला आहे.
यासंदर्भात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे स्वतः बार्शी तालुक्यात या नामकरण सोहळ्याला उपस्थित असणार असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके यांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच शैक्षणिक शाळेला नाव देण्याचा पहिला मान सोलापूर जिल्ह्याला मिळाला आहे.
News Title – The school in Solapur district will be named after Manoj Jarange
महत्त्वाच्या बातम्या-
शिंदे-पवारांचा फायदा नाही, विधानसभेला भाजप स्वबळावर लढणार?
बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?
आज रंगणार भारत विरुद्ध अमेरिका थरार; कोण वरचढ ठरणार?
पंकजाताईंचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी लागला; बीडमध्ये अजूनही घडतंय बरचं काही
मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली! रात्री अडीच वाजता सलाईन लावली






