कहर! चालत्या बाईकवरच कपल झाले सुरू…, पाहा व्हिडीओ

On: October 11, 2023 5:50 PM
---Advertisement---

लखनऊ | चालत्या बाईकवर रोमान्स करणं आता सामान्य गोष्ट झाल्याचं पाहायला मिळतोय. रोज एक ना एक व्हिडीओ तरी सोशल मीडियावर व्हायरल होतोच. ज्यात काही लोक विनाकारण गाडीवर जीवघेणा स्टंट करताना दिसताना दिसतात. त्यात काही कपल तर भान विसरून रोमान्स करताना देखील दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर नॅशनल हायवेचा NH-9 असल्याचं सांगण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, बाईकवर बसलेल्या जोडप्याने वाहतूक नियमांचा फज्जा उडवला आहे. बाईकवर बसलेला तरुण भरधाव वेगात बाईक पळवत आहे आणि त्याच्यासमोर त्याची प्रेयसी त्याला घट्ट मिठी मारुन बसली आहे. या मुलाची प्रेयसी पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे.

गाडी चालवणाऱ्याने हेल्मेट देखील घातलेलं व्हिडीओमध्ये दिसत नाहीये. व्हिडीओ व्हायरल होताच हापूर पोलिसांनी या जोडप्याला मोठा दंड ठोठावला आहे. दुचाकी चालकाला मोटार वाहन कायद्यानुसार आठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now