मुंबई | हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी आंदोलकांनी केल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपला राजीनामा लिहून दिला.
मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
मराठा आरक्षणासाठी विविध जिल्ह्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी आपापले राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे दिले आहेत. काही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देत सरकारला धारेवर धरलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






