ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुण्यात सर्वात मोठी कारवाई!

On: October 26, 2023 12:17 PM
---Advertisement---

पुणे | ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता या प्रकरणी पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी एका शैक्षणिक संस्थेचा प्रमुख विनय अर्हना याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलीस त्याची चौकशी करणार आहेत. विनय अर्हनाचा ड्रायव्हर दत्ता डोके (Datta Doke) याला या प्रकरणात अटक झाली होती.

पुण्यातील रोझरी स्कूल या शैक्षणिक संस्थेचा संचालक विनय अर्हना याला केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्याचा ललित पाटीलशी संबंध आलेला होता. दोघांची ओळख ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये झाली होती.

अर्हनाचा कार चालक दत्ता डोके ससून रुग्णालयात रोज घरचा डबा घेऊन येत होता. त्यामुळे त्याची देखील ललित पाटीलशी ओळख झालेली होती. या ओळखीतून ललित पाटील रुग्णालयातून पसार झाल्यावर अर्हनाच्या चालकाने त्याला मदत केल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now