Badlapur | बदलापूरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने (Badlapur Case Accused Akshay Shinde) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय शिंदेने स्वत:वरच झाडून घेतली गोळी
अक्षय शिंदे हा गंभीर जखमी असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.
अक्षयला वाचवण्यासाठी गेलेल अधिकारी देखील जखमी झाले आहेत. तळोजा कारागृहातून पोलीस त्याला बदलापूरला घेऊन येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जातं आहे.
Badlapur School Crime | काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्वेला असणालेल्या एका नामांकित शाळेतील एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या अशा दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती.
सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यांची तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचीही माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर
नवऱ्याचा लटकलेला मृतदेह, पत्नीची खाली हळदी-कुंकवाने पूजाअर्चा; इथं घडली धक्कादायक घटना
आनंदाची बातमी! राज्यातील लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता
रोहित शर्माची भर मैदानात जादू?, बेल्स फिरवल्या मग मंत्रही फुंकला; पाहा Video






