ठाणेकरांनो 3 दिवस ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग?

On: January 30, 2026 2:50 PM
Thane Traffic Diversion
---Advertisement---

Thane Traffic Diversion | ठाणे शहरात साकेत-बाळकुम रोड परिसरात होणाऱ्या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घातले असून हे नियम 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत लागू राहणार आहेत. (Thane Traffic Diversion)

कोणते मार्ग बंद राहणार? :

साकेत कॉम्प्लेक्स, बाळकुम नाका आणि लोढा संकुल परिसरात त्रि मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. पोलीस उप आयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी मोटार वाहन कायद्यानुसार हे आदेश जारी केले आहेत. (Thane Traffic Diversion)

कळवा क्रिक नाका येथून साकेत मार्गे बाळकुमच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना साकेत कॉम्प्लेक्सजवळील महालक्ष्मी मंदिर परिसरात प्रवेशबंदी असेल. तसेच कशेळी येथून बाळकुम मार्गे साकेतकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बाळकुम नाका येथे थांबवण्यात येणार आहे. माजिवडा गावातून लोढा संकुलातून बाहेर पडून साकेतकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनाही या काळात प्रवेश दिला जाणार नाही.

Thane Traffic Diversion | पर्यायी मार्ग कोणते? :

कळवा क्रिक नाक्याकडून येणाऱ्या अवजड वाहनांनी महालक्ष्मी मंदिर येथून डावीकडे वळून रुस्तमजी कट मार्गे नाशिक-मुंबई महामार्गावर जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कशेळी बाजूकडून येणारी वाहने माजिवडा प्रभाग समिती चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील. तर लोढा संकुलातून बाहेर पडणाऱ्या वाहनांनी बाळकुम नाका मार्गे किंवा यु-टर्न घेऊन माजिवडा गोल्डन नाका मार्गे इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Thane Traffic Diversion News)

ही निर्बंध व्यवस्था केवळ अवजड वाहनांसाठी लागू असून पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्ण सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी या तीन दिवसांत नियोजित मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Thane Traffic Alert: 3-Day Diversions Announced, Check Closed Roads and Alternate Routes

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now