मोठी बातमी! ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव, रूग्णांची संख्या आली समोर

On: July 10, 2024 6:27 PM
Thane Swine Flu
---Advertisement---

Thane | ठाणे (Thane) शहरात स्वाईन फ्ल्यूने शिरकाव केला आहे. सध्या पावासाचं वातावरण आहे.  ठाणे, मुंबई आणि रायगड येथे मोठ्या प्रमाणात पावासाने थैमान घातलं आहे. त्यानंतर आता ठाणे (Thane) शहरात स्वाईन फ्ल्यूने शिरकाव केला आहे. यामुळे ठाणेकरांसाठी  चिंतेची बाब आहे. ठाणे (Thane) येथे सध्या स्वाईन प्ल्यूचे 70 रूग्ण आढळून आले आहेत. तसेच मागील वर्षी पावसाळ्यात स्वाईन फ्ल्यूचे 87 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे (Thane) महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील हॉल हा स्वाईन फ्ल्यूच्या रूग्णालयासाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड करण्यात आला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली आहे.

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव

विशेष म्हणजे 2009 मध्ये हा आजार आला होता. यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. भारतात अनेकांना या आजाराची लागण झाली होती. या आजारामुळे काही रूग्ण हे दगावले होते. यामुळे आता नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा. तसेच खोकत असताना आणि शिंकत असताना रूमाल वापरावा.

स्वाईन फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार आहे.  H1N1 या व्हायरसमुळे लागण होऊ शकते.  2009 साली WHO रोग संसर्गजन्य असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. हा आजार केवळ माणसांमुळे नाहीतर प्राण्यांमुळे देखील होण्याची चिन्हे आहेत. थूंकी, खोकला आणि शिंकणे या माध्यमातून स्वाईन फ्ल्यूची लागण होऊ लागते. डोळे, नाक आणि तोंडाला तसेच त्वचेला संपर्क आल्यास विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीला स्वाईन फ्ल्यूची लागण होईल.

स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे

ताप येणे, थंडी वाजणे, अंग दुखी, सर्दी होऊन नाक वाहणे, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, पोटात मळमळणे, उलटी, यांसारखी लक्षणे ही स्वाईन फ्ल्यूमध्ये दिसू लागतात. गर्भवती महिला, वृद्ध महिला आणि पुरूष ज्यांचं वय हे 65 हून अधिक आहे त्यांना याची लागण लवकर होऊ शकते. मधुमेह, किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

News Title – Thane Muncipal Corporate In Report 70 Swine Flu Cases

महत्त्वाच्या बातम्या

पती रणवीर सिंहसमोरच ओरीने दीपिकासोबत केलं असं काही की..; फोटो पाहून चाहते हैराण

“सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू”; लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा

“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट

बद्रीनाथमधील पातालगंगा टनलजवळ भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग झाले बंद; पाहा थरारक Video

वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!

Join WhatsApp Group

Join Now