कल्याण आणि ठाणेच्या वाहतुकीत मोठा बदल! १४ जुलैपर्यंत ‘हे’ मार्ग बंद, पाहा पर्यायी मार्ग

On: June 23, 2025 10:07 AM
Pune Traffic Change
---Advertisement---

Thane-Kalyan Traffic Changes | ठाणे आणि कल्याणमधून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहतूक पोलिसांनी ठाणे-घोडबंदर रोड आणि कल्याण स्टेशन परिसरातील काही मार्गांवर मोठे बदल केले असून, पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Thane-Kalyan Traffic Changes)

मुंबई मेट्रो लाइन 4 च्या कामामुळे ठाणेतील काही मार्ग २२ जूनपासून १४ जुलैपर्यंत रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत बंद राहणार आहेत. यामध्ये कासारवडवली वाहतूक उपविभागाने जड वाहनांना बंदी घालून नवा मार्ग सूचित केला आहे. त्याचप्रमाणे कल्याण रेल्वे स्थानकाजवळील सुभाष चौक ते वालधुनी उड्डाणपुल मार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

ठाणे-घोडबंदर रोडवरील वाहतुकीत मोठा बदल :

ठाण्याच्या गायमुख स्टेशन जवळ ‘U’ गर्डरच्या कामामुळे जड वाहनांना पिलर क्रमांक ८५ पासून प्रवेश बंद करण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग:

पिलर क्र. ८५ जवळून पोरबंदर-ठाणे मुख्य रस्त्यावर विरुद्ध दिशेने जाऊन, पिलर क्र. १०२ वर उजवीकडे वळावे व इंडियन ऑईल पंपाजवळून पुढे प्रवास करावा. (Thane-Kalyan Traffic Changes)

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग:

हलकी वाहने पिलर क्र. ८५ जवळून सर्व्हिस रोडने पुढे जाऊन इंडियन ऑईल पंपाजवळील मुख्य रस्त्याने पुढे जाऊ शकतात.

ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी:

नागला बंदर व आशा वाईन शॉपजवळून प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. DP ७२, ७३ मार्गे सर्व्हिस रोडने लोढा स्प्लेन्ड्रापर्यंत जाऊन मुख्य रस्त्यावर प्रवेश करता येईल.

कल्याण-उल्हासनगर वाहतुकीत बदल; अवजड वाहनांना बंदी :

कल्याणच्या सुभाष चौक ते वालधुनी उड्डाण पुलादरम्यान अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे छोट्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र, अद्याप पुरेशी जनजागृती न झाल्याने अनेक अवजड वाहने याच मार्गावर येत आहेत.

वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Thane-Kalyan Traffic Changes)

कोणत्या वाहनांना मिळणार सूट?

या वाहतूक बदलांमधून खालील अत्यावश्यक सेवांची वाहने वगळण्यात आली आहेत:

पोलीस वाहने

अग्निशमन दल

रुग्णवाहिका

ग्रीन कॉरिडॉरची वाहने

ऑक्सिजन गॅस वाहने

News Title: Thane-Kalyan Traffic Changes: Heavy Vehicle Ban, New Diversions Announced Till July 14

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now