टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील ‘या’ खेळाडूला मिळणार घर आणि सरकारी नोकरी!

On: July 9, 2024 7:07 PM
Telangana government will give job and house to Mohammed Siraj
---Advertisement---

Mohammed Siraj | 29 जूनरोजी आयसीसी टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर भारताने आपलं नाव कोरलं. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी-20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत ही विजयी कामगिरी केली. यानंतर भारतीय संघाची मुंबईमध्ये ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली.

संपूर्ण भारतीयांसाठी हा क्षण ऐतिहासिक आणि अत्यंत भावुक होता. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला तेलंगणा सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे.

मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार देणार नोकरी आणि घर

भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग राहिलेल्या मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार घर आणि सरकारी नोकरी देणार आहे. आज (9 जुलै) मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सिराजला (Mohammed Siraj) भेटीसाठी आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल सिराजचे अभिनंदन केले.

तसेच सोशल मीडियावर एक पोस्टद्वारे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिराजला घर आणि सरकारी नोकरी देण्यात येणार, असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सिराजला पुष्पगुच्छ देऊन त्याचे कौतुकही केले. याबाबतची पोस्ट आता तूफान व्हायरल झाली आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला सिराजचा गौरव

मोहम्मद सिराज याने भारत देशाला आणि तेलंगणा राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कीर्ती मिळवून दिली आहे. T20 World Cup 2024 जिंकून हैदराबादला आलेल्या सिराजने शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सिराजचा गौरव करण्यात आला.

तसेच विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने सिराजला (Mohammed Siraj) घर आणि सरकारी नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. हैद्राबाद किंवा आसपासच्या भागात योग्य जागा शोधावी तसेच सरकारी नोकरी देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला 125 कोटी रूपयांचे बक्षीस दिले आहे. या बक्षिसाचा लाभ खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

News Title – Telangana government will give job and house to Mohammed Siraj  

महत्त्वाच्या बातम्या-

स्क्रीनसमोर जास्त वेळ बसल्याने डोळ्यांची जळजळ होतेय?, ‘या’ उपयांनी मिळेल आराम

“तात्यांचं शेवटचं स्टेशन हे मातोश्री..”; वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशावर संजय राऊतांचं वक्तव्य

सोन्याने घेतली पुन्हा भरारी, काय आहेत आजचे दर?

वरळी हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्य आरोपीला पोलिसांनी..

अखेर वसंत मोरेंनी बांधलं शिवबंधन; पक्षप्रवेश होताच उद्धव ठाकरेंनी दिली मोठी जबाबदारी

Join WhatsApp Group

Join Now