विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतमोजणी; ‘त्या’ गोष्टीचा ठाकरे गटाने घेतला धसका?

Teachers And Graduates Elections Result | विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी आज मतमोजणी केली जाणार आहे. या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी निवडणूक झाली होती. त्याचा आज 1 जुलैरोजी निकाल लागणार आहे.

निकाल लागण्यापूर्वीच एका गोष्टीचा ठाकरे गटाने धसका घेतल्याचं दिसतंय. मतमोजणीवेळी चुकीचा प्रकार होऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे मोठमोठे नेते मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत .लोकसभेच्या मतमोजणीवेळी बऱ्याच ठिकाणी गोंधळ झाला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठाकरे गटाचे नेते थेट मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत.

‘या’ चार जागांसाठी आज मतमोजणी

आज लागणाऱ्या निकालात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मुंबई पदवीधरमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत (Teachers And Graduates Elections Result)आहे. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसच्या रमेश किर यांच्यात सामना रंगला आहे.

नेरुळ नवी मुंबई येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या तीन मतदार संघाची मतमोजणी होत आहे. ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकी दरम्यान मतमोजणी वेळी फेरफार केल्याचा आरोप केला होता.

ठाकरे गटाचे नेते थेट मतमोजणी केंद्रावर

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणूनच ठाकरे गटाने खबरदारी घेतली आहे. यावेळी मुंबई पदवीधर मतदार (Teachers And Graduates Elections Result) संघाचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आणि युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्यासह इतर पदाधिकारी मतमोजणी केंद्रावर पोहचले आहेत.

News Title –  Teachers And Graduates Elections Result 

महत्त्वाच्या बातम्या-

‘ड्रेस घातलेल्या महिलांनी…’; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर शरद पवार यांचं मोठं वक्तव्य!

रोहित शर्माने बारबाडोसच्या मैदानात रोवला भारताचा झेंडा; व्हिडोओ बघून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘अंपायरने गडबडीत चुकीचा निर्णय दिला’; आफ्रिका मीडियाचा मोठा दावा

पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांना धक्का