…तर रोहितसेना ऑस्ट्रेलियाचा वचपा काढणार? कांगारूंना दाखवणार घरचा रस्ता

On: June 24, 2024 8:24 AM
Ind vs Aus
---Advertisement---

Ind vs Aus l आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात T20 वर्ल्डकप सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो किंवा मरो असणार आहे. या सामन्यात उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. याशिवाय आज टीम इंडियाला 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कांगारूंविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट :

आज टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि अफगाणिस्तान संघाने सुपर-8 मधील शेवटचा सामना बांगलादेशकडून जिंकला तर ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये कांगारूंनी टीम इंडियाचा पराभव करून करोडोंची मने तोडली होती. अशा स्थितीत रोहित सेनेला हा पराभवाचा वचपा काढण्याची संधी आली आहे.

मात्र आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथे होणार आहे. रविवारी येथे जोरदार पाऊस झाला आहे. तर हवामान अहवालानुसार आजही येथे पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आली आहे. हा सामना पावसात वाहून गेल्यास ऑस्ट्रेलियन संघाला मोठा फटका बसू शकतो. त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Ind vs Aus l पराभूत होऊनही ऑस्ट्रेलिया अशाप्रकारे उपांत्य फेरीत जाईल :

हा सामना पूर्णपणे रद्द झाल्यास टीम इंडियाला सेमीफायनलचे तिकीट मिळेल. कारण टीम इंडियाला 5 गुण मिळतील. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील कारण विजयाची नोंद करून पूर्ण 2 गुण मिळवण्याऐवजी केवळ 1 गुण मिळवणे शक्य होईल. अशा स्थितीत अफगाणिस्तानने पुढच्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केल्यास ते उपांत्य फेरीत पोहोचतील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल.

वास्तविक, ऑस्ट्रेलिया हरल्यानंतर त्याला उपांत्य फेरीत जाण्याची संधी देखील असेल. मात्र, त्यानंतर त्याला बांगलादेशच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. जर ऑस्ट्रेलिया हरला आणि बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवले, तर चांगल्या नेट रनरेटमुळे कांगारू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतात.

News Title – T20 World Cup 2024 Ind vs Aus

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा लढवणार? जाणून घ्या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला

या राशीच्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ होईल

“आदित्य ठाकरे वरळीत उभे राहणार की दुसरा मतदारसंघ शोधणार?”

आमदाराच्या पुतण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर!

पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीवर वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now