“मला मतदान करु दिले नाही, कारण…”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

On: May 13, 2024 6:26 PM
Suyash Tilak
---Advertisement---

Suyash Tilak | चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. दिग्गजांसह अनेकांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. मराठी अभिनेते विक्रम अगाशे, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, अमोल पालेकर, जुई गडकरी, यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अशातच मराठी अभिनेता सुयश टिळकला (Suyash Tilak) मतदानच करता आलं नसल्याची माहिती त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली आहे.

मराठी अभिनेता सुयश टिळकने (Suyash Tilak) मतदान न करताच पाठ फिरवली आहे. कारणही तसेच आहे. सकाळी 7 वाजताच मराठी अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) मतदानासाठी मतदान केंद्रावर आला होता. त्याने तब्बल 3 ते 4 तास मतदान केंद्रावर घालवले. त्याचं नाव मतदान यादीत नसल्याने त्याने मतदान केंद्रावरून मत न देताच आपली पाठ फिरवली.

आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत मनातील खंत त्याने व्यक्त केली आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये त्याने आपल्याला मतदान करता न आल्याचं कारण नमूद केलं आहे. यामुळे त्याने नाराजी व्यक्त करत त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली आहे.

काय होती पोस्ट?

“गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले. त्यानंतर सुयशने (Suyash Tilak) आज सकाळी मतदान केंद्रावर त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला.

सकाळी 7 वाजता मतदानासाठी मतदान केंद्रावर गेलो होतो. तेव्हा मी यादीत माझं नाव शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यादीमध्ये माझं नाव सापडलं नाही. म्हणून मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे काहींचे मतदारसंघ बदलल्याचं दिसून आलं आहे.

मी दर निवडणुकीला मतदान करत असतो. मात्र मला यंदा मतदान देता आलं नाही. कोणत्याही इतर पर्यायाने मतदान करू दिलं जात नाही याची मला खंत वाटते, अशी पोस्ट शेअर करत त्याने खंत व्यक्त केली आहे.

suyash tilak 2024 05 f9505edf7fc25015c0ca5ac46ae9aa25

News Title – Suyash Tilak Return Home From Without Voting

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत EVM ठेवलेल्या रुमचे CCTV 45 मिनिटं बंद; शरद पवार गटाकडून गैरप्रकार घडल्याची शंका

धक्कादायक! पुण्यात बड्या नेत्याच्या नावे बोगस मतदान तर जिवंत मतदाराला दाखवलं मृत

“शहरभर मुरलीधर”, प्रवीण तरडेंची फेसबुक पोस्ट

“मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक…”, राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचा करारा जवाब

लग्नानंतरही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं श्वेता बच्चनचं अफेअर?, मोठी माहिती समोर

Join WhatsApp Group

Join Now