सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

On: October 5, 2025 5:52 PM
Sushma Andhare
---Advertisement---

Shushma Andhare | ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Faction) नेत्या सुषमा अंधारे (Shushama Andhare) यांनी रामदास कदमांना (Ramdas Kadam) उद्देशून एक वक्तव्य केलं आहे. रामदास कदमांना एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली.

भुसेंचे अंधारेंना जोरदार प्रत्युत्तर

शिवसेना शिंदे गटाचे (Eknath Shinde Faction) नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला गेला, तसेच बाळासाहेबांचे हाताचे ठसे घेण्यात आले असल्याचा दावा केला. रामदास कदमांनी हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते, असा प्रश्न उपस्थित केला.

यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करत त्यांना एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणायचे आहे, अशी प्रतिक्रिया दिली. यावर शिंदे गटाचे नेते व मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली.

नाशिकमध्ये (Nashik) पत्रकारांशी संवाद साधताना दादा भुसे म्हणाले की, “तुम्ही जे नाव घेतले, ते शिवसेनेत कधीपासून आहेत? त्यांना शिवसेनेची किती माहिती आहे? ठाकरे साहेबांचे जितके शिलेदार होते त्यात एक रामदासभाई होते. शिवसेना वाढली त्यात अनेक नेते आलेत, त्यात रामदास भाई कदमदेखील आहेत. काही नेते वेगळ्या पक्षात गेले आहेत. नारायण राणे, छगन भुजबळ यांनी देखील शिवसेना वाढविण्यात सहभाग घेतला. सुष्मा अंधारे यांनी काय टीका करायची याचा विचार करावा.”

पालकमंत्रीपदाबाबत दादा भूसेंची मिश्कील प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी  जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. मात्र, अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांचा तिढा अद्याप कायम आहे.

यावर मंत्री दादा भुसे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली असून, “हा विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या दारात न्यावा लागेल,” असे ते म्हणाले. दादा भुसे यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आले आहे.

News Title – Sushma Andhare’s major allegation: ‘Ramdas Kadam intends to create trouble for Eknath Shinde’

Join WhatsApp Group

Join Now