“बाप बाप होता है, आता देवेंद्र फडणवीसांना समजलं असेल”

On: June 4, 2024 4:47 PM
Uddhav Thackeray revelation about meeting with Amit Shah and Devendra Fadnavis in 2019  
---Advertisement---

Sushma Andhare | राज्याच्या लोकसभा निवडणुकीच्या काही मतदारसंघाचे निकाल लागले आहेत. ठाकरे गटातून दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाईंनी विजयी मिळवला. यामुळे आता ठाकरे गटाच्या शिवसेनेनं शिवसेना भवनाबाहेर आनंद व्यक्त केला. गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे कडाडल्या

बाप बाप होता है ! असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) कडाडल्या आहेत. शिवसेनेत उभी फूट पडली. यामुळे ठाकरे गटाला हिणवलं गेलं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. मोदी यांना समजलं असेल शिवसेना कोण? आणि नकली शिवसेना कोण? असा सवाल आता सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी माध्यमांसोबत बोलत असताना केला आहे.

अशातच आता मुंबईमध्ये ठाकरे गटाचे तसेच महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून येतील, असा विश्वास सार्थ ठरण्याची सर्वाधिक शक्यता नाकारता येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपने खोके वाटले पण महाराष्ट्राच्या जनतेनं खोक्याला कौल दिला नाही. कारण महाराष्ट्राचं आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. आता आदित्य ठाकरे यांनी देखील स्वत:चं अस्तित्व सिद्ध केलं असल्याचं सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या आहेत.

सुषमा अंधारे भावूक

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांच्या विजयाची चाहुल लागली होती. यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर जल्लोष केला. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी बोलत असताना अंधारे या भावूक झाल्या होत्या. तसेच अनिल देशमुखांनीही या मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

News Title – Sushma Andhare Slam To BJP And Devendra Fadanvis After Shivsena Thackeray Lead In Loksabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या

बारामती शरद पवारांचीच! लेकीनं गड राखला, अजित पवार आता मिशा काढणार?

उमेदवाराचा EVM मशिनवर आक्षेप, रावेर मतदारसंघात खळबळ

बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; सुनेत्रा वहिणींचा दारूण पराभव

इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!

सांगलीत ठाकरे आणि भाजपला धक्का; बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर

Join WhatsApp Group

Join Now