“पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत”

On: January 6, 2023 11:03 AM
---Advertisement---

पुणे | हातामध्ये, मनामध्ये कला असते. पण त्याला मार्केट मिळत नाही. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याचं उदाहरण मीच आहे. मला पवारांनी हात लावला आणि मी मोठा झालो, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. इथे माझे अनेक मित्र आहेत. आम्ही पुण्यात एकत्र शिकलो. आमच्या क्षेत्रात वेगळं करणारे फक्त आम्ही मित्र होतो, असं ते म्हणाले.

माझी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली. आणि आम्ही नवीन पक्ष काढण्याचं निर्णय घेतला. पहिल्यांदा निवडणुका आल्या आणि तिकिट वाटपावेळी साताऱ्यासाठी मला श्रीनिवास पाटील यांचं नाव आठवलं. मध्यंतरी त्यांना आम्हाला तिकिट देता आलं नाही, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, रोहीत पवारांच्या आई सुमित्रा पवार तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

शरद पवार यांनी यावेळी सुनेचं तोंडभरून कौतुक केला. माझ्या सुनेचा सत्कार आज केला, याचा मला मनापासून आनंद होत आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now