Suryakumar Yadavच्या बायकोच्या एका पोस्टमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ

On: December 16, 2023 7:41 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

Suryakumar Yadav | मुंबई इंडियन्सने आपल्या IPLच्या आगामी सीजनसाठी हार्दिक पांड्याला कर्णधार करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. ही घोषणा झाल्याच्या काहीच वेळानंतर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीने तिच्या अधिकृत अकाऊंटवरुन एक स्टोरी पोस्ट केली होती, मात्र पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तीने ही स्टोरी डिलीट केली.

नेमका काय घडला प्रकार?-

रोहित शर्माला हटवून त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या अनेक हंगामांमध्ये रोहितनं मुंबईनं नेतृत्त्व केलं, तसेच मुंबईला पाच विजेतेपदं देखील मिळवून दिली. मात्र आगामी हंगामात तो कर्णधारपदी दिसणार नाही, तर त्याच्या जागी हार्दिक पांड्या मुंबईचं नेतृत्त्व करताना दिसेल. यावरुन आता वाद होताना पहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवताच सर्व चाहत्यांची निराशा झाली. चाहत्यांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. काही जणांनी MIला सोशल मीडियावर अनफॉलो करणं सुरु केलं आहे तर काही जण जर्सीसह MIचा झेंडा जाळताना दिसत आहे.

सूर्यकुमारच्या बायकोची पोस्ट-

मात्र, या सगळ्यामध्ये देविशा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंवरुन एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिलं होतं की, ‘तुम्ही लोकांशी ज्या प्रकारे वागता ते नेहमी लक्षात ठेवलं जाईल” तिची ही स्टोरी अपलोड होताच व्हायरल झाली. त्यानंतर काही वेळातच तीने ही स्टोरी डिलीट केली.

Devisha

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) पत्नीच्या या पोस्टवर नाना तर्कवितर्क लावले जात आहेत. यामध्ये रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार केल्याची गोष्ट तिला पटली नसावी इथपासून ते सूर्यकुमारला कर्णधार न करता हार्दिकला कर्णधार केल्याने ती नाराज झाली असावी आणि त्यातून तीने अशा प्रकारची स्टोरी ठेवली असावी, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

सूर्यकुमारचंही हृदय तुटतुट तुटलं!-

दुसरीकडे सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) देखील या प्रकारानंतर चर्चा झाली. कारण होतं सूर्यकुमार यादवनं देखील आपल्या सोशल मीडिया खात्यांवर ब्रोकन हर्टवाला इमोजी शेअर केला होता. त्याने अशी इमोजी शेअर का केली?, याची चर्चा चालू असताना आता त्याच्या बायकोच्या स्टोरीने देखील क्रीडा वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

News Title: Suryakumar Yadav wife devisha shetty post viral Mumbai Indians

महत्त्वाच्या बातम्या-

CID फेम अभिनेत्रीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ

Uddhav Thackeray | ‘तुम्ही अदानींचा बूट कशासाठी चाटता’; उद्धव ठाकरे संतापले

Mumbai Indians | असा झाला Rohit Sharmaचा गेम!, समोर आली पडद्यामागची खरी कहाणी

Pune Accident | पुण्यात घडला भयंकर अपघात, वॅगन-आर कारचा चक्काचूर

Bacchu Kadu | ‘…नाहीतर आम्हाला’; मराठा आरक्षणावरून बच्चू कडूंचा सरकारला इशारा

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now