‘ते टॉप सिक्रेट…’; सुरेश धस यांच्या नव्या गौप्यस्फोटाने एकच खळबळ

On: January 3, 2025 6:35 PM
murder
---Advertisement---

BJP | भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्त्वाचे गौप्यस्फोट केले आहेत. सुरेश धस यांनी एपसी नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यावेळी एसपींनी त्यांना काय सांगितलं, याबाबत महत्त्वाची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मी एसपींना याबाबत बोललो. एसपी साहेब बोलले की साहेब, काही टॉप सिक्रेट्स आहेत. साहेब आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत. ते खरं आहे आणि योग्य आहे ना. माहिती लिकेज झाली तर ती माहिती आरोपींपर्यंत जावून पोहोचू शकते, असं सुरेश धस (Suresh Dhas) म्हणालेत.

“आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती”

या प्रकरणात एका कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले आहेत. दीड कोटी रुपये राहिले आहेत, असं धसांनी सांगितलंय.

दीड कोटी रुपये राहिले तर माणसं कोणी पाठवले. ते माणसं डायरेक्ट आकांनीच पाठवले. आकांनीच सांगितलं होतं. आकांनीच सांगिल्यावर हे लोक शुक्रवारी तिथे गेले होते. आता काय आहे, सीडीआर काढून कोण कुणाला काय बोललं हे सर्व बाहेर येतंय. त्यामुळे मला नाही वाटत की, आका यातून बाहेर राहतील, असं सुरेश धस म्हणाले.

घटना भीषण आहे- सुरेश धस

मी उद्या परभणीच्या आणि परवा पुणेच्या मोर्चालाही जाणार आहे. 6 तारखेला राज्यपालांकडे चला असं सांगत आहेत. मी देखील तिथे जाणार आहे. इथे पक्षाचा विषय नाही. घटना भीषण आहे, असं सुरेश धस यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

पदभार स्विकारताचं एकनाथ शिंदे अ‍ॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय

अखेर त्याने तोंड उघडलं! वाल्मिक कराडने मागितली तब्बल ‘इतक्या’ कोटींची खंडणी

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य यादी आली समोर

वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना ‘या’ जिल्ह्यात हलवा; भाजप आमदाराने केली मागणी

ऐकावं ते नवलच!, पुण्यात फक्त ३०० रुपयांत केलं लग्न

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now