सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण; अजितदादा नव्हे तर ‘या’ नेत्याला बांधली राखी

On: August 19, 2024 8:34 AM
Supriya Sule tied a rakhi to Bhaskar Bhagre
---Advertisement---

Supriya Sule | आज (19 ऑगस्ट) रक्षा बंधनाचा सण संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय. बहीण-भावाच्या नात्याचा हा उत्सव आहे. आजच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असते. राखी बांधून ती भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. आजच्या या खास प्रसंगी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा सण साजरा केला आहे. (Supriya Sule)

मात्र, या सणाला यावर्षी सुळे यांनी त्यांचे बंधु तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी न बांधता दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली. काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता.

सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना बांधली राखी

अजित पवार हे भाजपसोबत सध्या सत्तेत आहेत. त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत राष्ट्रवादीशी बंड केलं. आता राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. तर खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसलेला आहे. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकमेकांचे (Supriya Sule) राजकीय विरोधक आहेत.

खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण-भावाच्या जोडीला देशभर ओळखले जाते. राष्ट्रवादी फुटल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे या बहीण-भावाकडे लागलं आहे. आज रक्षा बंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे आपल्या मोठ्या भावाला राखी बांधणार का?,याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.

सुप्रिया सुळे-अजित पवार राजकीय विरोधक

सुप्रिया सुळे या सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हा सण साजरा केला आहे. सुळे यांनी खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली. (Supriya Sule)

सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. सुप्रिया सुळे यांनी बारामतीची निवडणूक लढवली. तर अजित पवार  यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीत उतरल्या होत्या. या काळात प्रचार करताना अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली होती.

News Title –  Supriya Sule tied a rakhi to Bhaskar Bhagre

महत्त्वाच्या बातम्या-

आज लाडक्या भावाला राखी नेमकी कधी बांधावी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज रक्षाबंधनाचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, मोठा धनलाभ होणार!

‘या’ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार रोमँटिक टर्न!

मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य!

रेखा यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘मी तिघांसोबत…’

Join WhatsApp Group

Join Now