राखी सावंतला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका!

On: April 22, 2024 1:03 PM
rakhi sawant
---Advertisement---

Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार चार आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. एवढंच नव्हे तर राखी सावंतने जामीनासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

राखीला सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका

राखी सध्या दुबईमध्ये राहतेय. राखीनं काही महिन्यांआधी आदिल खान दुर्रानी बरोबर लग्न केलं होतं. काही महिन्यात आदिल खान आणि राखी सावंत यांच्या वाद झाले. राखीने आदिलला जेलची हवा दाखवली. जेलमधून परत आल्यानंतर आदिल खाननं दुसरं लग्न केलं.

दुसरं लग्न केल्यानंतर मात्र आदिलनं राखीला धडा शिकवण्याचा विडाच उचचला आहे असं म्हणावं लागेल. आदिलनं राखीवर त्याचा अश्लील व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला होता. याच आरोपांमुळे राखीविरुद्ध अश्लील व्हिडिओ लीक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एफआयआरनंतर राखी अटक टाळण्यासाठी दुबईला पळून गेल्याची माहिती आहे.

FIR नंतर राखी सावंतनं अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र राखीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. यामुळे राखीच्या अडचणी वाढल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

डिसेंबर 2022 मध्ये राखी सावंतने सोशल मीडियावर दावा केला होता की तिने आदिल दुर्रानीशी लग्न केले आहे. या लग्नाला आदिलनेही दुजोरा दिला होता. पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच राखीने आदिलवर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला. याप्रकरणी तिने तक्रारही दाखल केली होती.

राखीच्या तक्रारीनंतर आदिलला पोलिसांनी अटक केली, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर आदिलने राखीवर त्याचे वैयक्तिक व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही पवार एकत्र येणार का?, अजित दादांनी स्पष्टच सांगितलं

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या’ योजना ठरतायेत लाभदायक; मिळतोय भरघोस व्याजदर

राज्यात ‘या’ भागांना वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा

मुंबईचा आज राजस्थान रॉयल्सशी सामना, कोण मारणार बाजी?

‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now