Mumbai | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. कारण महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय. तसेच निकालानंतर दुसरीकडे महायुतीमधील (Mahayuti) खदखद बाहेर येत आहे.
महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये शाब्दीक वॉर सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे सध्या आमने-सामने आले आहेत. आधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू आहे. असं असताना राष्ट्रवादीच्या नेत्याने मोठं वक्तव्य केलंय. यामुळे मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिंदे गटाची झोपच उडालीये.
मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी भाजपच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून देखील मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक बॉम्ब टाकला आहे.
मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा अमित शहा यांच्या स्तरावर होईल. भाजपच्या आणि वरिष्ठ नेत्यांकडून ते अपेक्षित आहे. तेच यावर तोडगा काढतील. मुख्यमंत्री पदाचा कोणताही फार्म्यूला ठरला नाही. दोन दिवसात सगळ काही ठरेल, असं ते म्हणालेत.
Mahayuti | एकनाथ शिंदेंना भाजपकडून ऑफर
मुख्यमंत्रिपदावर दाबा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती आहे. राज्याचं उमुख्यमंत्रिपदाची किंवा मग केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचं कळतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी
सर्वात मोठी बातमी! नाराज एकनाथ शिंदेंना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर






