“आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील”

On: March 9, 2023 12:36 PM
---Advertisement---

मुंबई | ठाकरे गटाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य केलं.

ही वरळी शिवसेनेची आहे. ही वरळी उद्धव ठाकरे यांची आहे. ही वरळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचीच असेल. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो की, आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री (Cm) होतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करु, असं सुनील शिंदे म्हणाले. यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

अजून मंत्रिमंडळात एकही महिला नाही ही खंत आहे. टीव्हीवर मंत्र्यांकडून महिलांचा अपमान केला जातोय. महिलांना शिव्या देणारे देखील मंत्रिमंडळात आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

पुण्यातील एअरपोर्टसंदर्भात क्लॅरिटी नाही. दुसरं होईल की नाही जे आहे त्याचं एक्सटेंशन होईल की नाही यासंदर्भात कळावं. सोबतच नाशिकच्या कनेक्टिव्हिटीच्या अडचणी आहेत. कधी फ्लाईट्स असतात कधी नाही. त्यामुळे कन्सिटन्सी त्यात असावी, असं मत आदित्य ठाकरे यांनी मांडलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now