“भारत तुम्हाला पगार देतोय…”; सुनील गावसकर खेळाडूंवर भडकले

On: March 1, 2025 3:56 PM
Sunil Gavaskar
---Advertisement---

Sunil Gavaskar l भारताचे माजी कर्णधार आणि क्रिकेट समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंडच्या माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली आहे. कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy 2025) दरम्यान भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत (Dubai) खेळवले जाणार असल्याने इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती.

या मुद्द्यावरून भारतीय संघाला अनावश्यक फायदा मिळत असल्याचे आरोप इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी केले आहेत. मात्र, सुनील गावसकर यांनी हे आरोप फेटाळून लावत, भारतीय क्रिकेटमुळेच त्यांना पगार मिळतो, हे लक्षात ठेवावे, असा जोरदार टोला लगावला आहे.

गावसकर इंग्लंडच्या माजी खेळाडूंवर भडकले :

सुनील गावसकर यांनी इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन (Nasser Hussain) आणि मायकेल आथर्टन (Michael Atherton) यांना चांगलेच सुनावले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “भारताविषयी तक्रार करणाऱ्या क्रिकेटपटूंनी आपल्या देशाच्या क्रिकेटच्या स्थितीकडे लक्ष द्यावे. कारण भारतीय क्रिकेटमुळेच त्यांना पगार मिळतो.”

नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांनी ‘स्काय स्पोर्ट्स’ (Sky Sports) च्या पॉडकास्टमध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अधिक फायदा मिळत असल्याचा दावा केला होता. मात्र, गावसकर यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) खेळाडू रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) याने देखील भारताच्या प्रवासमुक्त कार्यक्रमावर टीका केली होती. त्याने सांगितले होते की, “पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या इतर सात संघांप्रमाणे भारतीय संघाला प्रवासाचा किंवा हॉटेल बदलण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, यामुळे रोहित शर्मा आणि संघावर दबाव राहील.” यावर प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले, “या वादावर भाष्य करणे योग्य नाही. कारण खेळपट्ट्या भारताच्या नियंत्रणाखाली नाहीत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवास हा एक नेहमीचाच भाग आहे.”

Sunil Gavaskar l “भारत क्रिकेटमधून मिळवतोय महसूल!” :

गावसकर यांनी इंग्लंडच्या माजी खेळाडूंना सुनावताना सांगितले, “ते कायम तक्रार करत असतात. त्यांना जागतिक क्रिकेटमध्ये भारताची भूमिका समजलेली नाही. गुणवत्ता, पगार, प्रतिभा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महसूल निर्मितीच्या बाबतीत भारताचा मोठा वाटा आहे. “टीव्ही हक्क आणि मीडिया उत्पन्नाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संपूर्ण जागतिक क्रिकेटला मोठा आर्थिक हातभार लावतो. त्यामुळे त्यांनी हे समजून घ्यायला हवे की त्यांचा पगारदेखील भारतामुळेच आहे.”

News title : Sunil Gavaskar Slams English Cricketers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now