अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची पहिली पोस्ट व्हायरल; वाचा सविस्तर

On: February 8, 2026 11:16 AM
Sunetra Pawar
---Advertisement---

Sunetra Pawar | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या असून, त्या पोस्टमधील शब्दांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामतीजवळ भीषण विमान अपघात :

मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ गंभीर अपघात झाला. सुरुवातीला ते जखमी असल्याची माहिती समोर आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. मात्र, काही वेळातच त्यांच्या निधनाची दु:खद बातमी प्रसिद्ध झाली. आजही अनेकांना ही घटना खरी वाटत नसून राज्यभर शोककळा पसरली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. धावपट्टीच्या आसपास विमान एका बाजूला झुकत असल्याचे दृश्य काही व्हिडीओंमध्ये स्पष्टपणे दिसले. या घटनेच्या चौकशीसाठी सीआयडी (CID) ने तपास सुरू केला असून अजित पवार यांच्या सचिवांचीही चौकशी करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. (Sunetra Pawar Post)

Sunetra Pawar | सुनेत्रा पवारांची सोशल मीडिया पोस्ट :

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, कुटुंबातील काही मतभेदही चर्चेत आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असतानाच हा धक्का बसल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी अपेक्षेप्रमाणे प्रचार केला नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी जनतेचे आभार मानत भावना व्यक्त केल्या.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल सर्व मतदारांचे मनापासून आभार. दुःखाच्या या काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (Nationalist Congress Party) नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शिस्तबद्ध, एकजुटीने आणि निष्ठेने काम करत दिवंगत अजितदादांच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पाला पुढे नेले, यासाठी त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या समर्पणामुळेच पक्षाचे विचार आणि कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

News Title: Sunetra Pawar’s First Post After Tragedy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now