Sunetra Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, पक्षाने उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग :
उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सायंकाळी राजभवनात सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे (Sunil Tatkare), धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनीही सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला आहे.
Sunetra Pawar | महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री :
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे. (DCM Sunetra Pawar)
त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. राज्याच्या सत्तासमीकरणांमध्ये या घडामोडीमुळे मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (first woman DCM)






