उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राला दिलं वचन! व्यक्त केला ‘हा’ निर्धार

On: February 10, 2026 1:43 PM
Sunetra Pawar
---Advertisement---

Sunetra Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या निधनानंतर त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून मंत्रालयात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते.

पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलं आहे. त्यांनी अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भावनिक ट्विटमधून व्यक्त केला निर्धार :

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवर ट्विट करत म्हटलं की, दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; मात्र त्यांच्या विचारांचा वारसा जपत सक्षम महाराष्ट्र घडवण्यासाठी मी संपूर्ण ताकदीने काम करेन. राज्याच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

तसेच शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे हीच आपली प्राथमिकता असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. विकासाभिमुख निर्णय आणि लोकाभिमुख प्रशासन हाच आपला मार्ग असेल, असंही त्यांनी ट्विटमधून नमूद केलं आहे.

Sunetra Pawar | नेत्यांसोबत बैठक, आगामी धोरणांवर चर्चा :

पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि अदिती तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. आगामी काळातील राजकीय आणि प्रशासकीय रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली.

पदभार स्वीकारल्यानंतर त्या आज पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार असून, राज्याच्या विकासकामांना गती देणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

News Title: Sunetra Pawar Takes Charge as Maharashtra’s First Woman Deputy Chief Minister, Makes Emotional Promise to State

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now