सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार? तर ‘हा’ युवा नेता होणार खासदार

On: January 31, 2026 1:23 PM
Sunetra Pawar
---Advertisement---

Sunetra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून मुंबई आणि बारामतीत बैठकांचं सत्र रंगले आहे. पार्थ पवार हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनील तटकरे (Sunil tatkare), प्रफुल्ल पटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार लवकरच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

राजीनाम्यानंतर त्यांची आजच विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होऊन संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ होणार असल्याची चर्चा आहे. अवघ्या काही तासांतच हा निर्णय अंमलात येणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार :

थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार असून तो राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज दुपारी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार असून हा कार्यक्रम केवळ 10 मिनिटांचा असणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Sunetra Pawar News)

दरम्यान, सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला माहिती नसल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले असून या संपूर्ण घटनाक्रमावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

Sunetra Pawar | पार्थ पवार राज्यसभेवर जाणार? :

सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पार्थ पवार (Parth Pawar) यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं समजत आहे. पार्थ पवार यांचं नाव राज्यसभेच्या खासदार पदासाठी पुढे करण्यात येणार असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे. स्वतः पार्थ पवार यांचीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचं सांगण्यात येत आहे.

यामुळे लवकरच पार्थ पवार यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडण्याची शक्यता बळावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या वेगवान हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणते मोठे निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Sunetra Pawar Likely to Resign as MP, Parth Pawar Set for Rajya Sabha

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now