Sunetra Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या मंगळवारी मोदी बागेत होत्या. सोमवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदी बागेत आल्या. त्या तासभर मोदी बागेत होत्या. त्यांनी नेमकी कोणाची भेट घेतली आहे याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा निवडणुकीत मैदानात होत्या. त्यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या. नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होती. यामुळे पवार कुटुंब आणि पक्षात उभी फूट पडली होती. अजित पवारांचे बंधू देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतच होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला होता.
सुनेत्रा पवार तासभर मोदी बागेत
पवार कुटुंब एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत होते. निवडणूक निकालात सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे. या निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी मंगळवारी गेल्या. त्यावेळी शरद पवार हे मोदी बागेत होत्या. सुमारे तासभर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदीबागेत होत्या. परंतु त्यांनी कोणाची भेट घेतली? त्यावेळी सुनेत्रा पवारांची (Sunetra Pawar) आणि शरद पवारांची चर्चा झाली का?, असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी सिल्व्हर ओक येथे गेले. त्यावेळी त्यांच्यात दीड तास ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून चर्चा सुरू होती. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यात वाद होत आहे. यामुळे आता शरद पवारांनी ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांतता राखावी म्हणून पुढाकार घ्यावा, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यानंतर आता लगेचच सुनेत्रा पवार शरद पवारांच्या मोदी बागेत गेल्या होत्या.
सुनेत्रा पवारांची शरद पवारांसोबत भेट झाली?
तसेच याचपार्श्वभूमीवर पुण्यातील शरद पवारांच्या मोदी बागेत शरद पवारांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) एक तास होत्या. मात्र त्यांची शरद पवारांसोबत भेट झाली की नाही?, याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही. यामुळे आता राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. काल छगन भुजबळ आणि दुसऱ्या दिवशी सुनेत्रा पवारांचं मोदी बागेत येणं, या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत.
News Title – Sunetra Pawar In Modi Bag At Sharad Pawar Home
महत्त्वाच्या बातम्या
पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली, मृतांचा आकडा आला समोर
23 वर्षीय तरूणीने संपवलं आपलं जीवन, मरीन ड्राईव्हवरून समुद्रात घेतली उडी
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा ग्राहकांना झटका!
“जिथे जातात तिथेच ते XXX खातात”; जरांगेंची पुन्हा एकदा भुजबळांवर सडकून टीका
“पदव्या घेऊन काय होणार नाही, पंक्चरचे दुकान टाका”; भाजप आमदाराचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला






