पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांकडे! सरकारचा मोठा निर्णय

On: February 3, 2026 3:10 PM
Pune Guardian Minister
---Advertisement---

Sunetra Pawar | अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्याकडे आणखी मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली असून, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ चौथ्या दिवशी झालेल्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती, मात्र आता सुनेत्रा पवार यांच्यावरच दोन्ही महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने राज्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे अर्थ खाते वगळता अजित पवारांकडे असलेली सर्व मंत्रालये सोपवण्यात आली आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही लवकरच त्यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी दिली आहे. त्यामुळे सरकार आणि पक्ष या दोन्ही पातळ्यांवर सुनेत्रा पवार यांची भूमिका अधिक निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

पुणे आणि बीडसाठी महत्त्वाचा निर्णय :

पुणे जिल्हा हा महाराष्ट्रातील आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जातो. अशा महत्त्वाच्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने प्रशासन आणि विकासकामांबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांना पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्येही या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Pune Guardian Minister)

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात आली आहे. अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील प्रशासनावर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं आणि तेथील जनतेशी मजबूत नातं तयार केलं होतं. त्यांच्या निधनानंतर बीडमध्येही शोक व्यक्त करण्यात आला होता. आता त्या जिल्ह्याचं पालकत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्याने, अजित पवार यांनी सुरू केलेली विकासकामं आणि प्रशासनिक सुधारणा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Beed Guardian Minister)

Sunetra Pawar | राजकीय वर्तुळात चर्चा, 9 फेब्रुवारीला मंत्रालयात उपस्थिती :

दरम्यान, सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अधिकृतपणे कामकाजाला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार राज्यभरातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मंत्रालयातून सातत्याने काम करत होते. त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार देखील प्रशासनात सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या शपथविधीवरून निर्माण झालेल्या चर्चांनंतर आता पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याने त्या निर्णयक्षम नेतृत्व सिद्ध करतील का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह बीड जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला होता. बारामती हे अजित पवार यांचं कर्मभूमी असल्याने तेथील जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. बीड जिल्ह्यातही त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे नागरिकांनी शोक व्यक्त केला होता. आता या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आल्याने, त्यांच्या नेतृत्वाखाली विकास आणि प्रशासनिक स्थैर्य टिकून राहील का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

News Title: Sunetra Pawar Appointed Guardian Minister of Pune and Beed After Ajit Pawar’s Demise

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now