सुदर्शन घुले, सुधीर सांगळेचा गेमओव्हर, केज कोर्टात झाला मोठा निर्णय!

On: January 4, 2025 5:14 PM
Sudarshan Ghule
---Advertisement---

Sudarshan Ghule l मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने सर्वत्र गदारोळ माजला आहे. या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी CID व SIT पथक नेमक्यात आलं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना राज्यातील विविध भागातून ताब्यात घेतलं आहे. अशातच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली होती, तर त्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरला देखील अटक करण्यात आली. दरम्यान आज या आरोपींना पोलिसांकडून केज न्यायालयात हजर करण्यात आलं होत. मात्र यावेळी केज न्यायालयाने या घटनेतील तीनही आरोपींना तब्बल 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावेळी सरकारी वकील, आरोपीचे वकील तसेच तपास अधिकारी यांचा युक्तिवाद ऐकल्यावर कोर्टाने पोलीस तपासासाठी या तीनही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र आता आरोपी 14 दिवसांसाठी पोलीस कोठडीत असल्याने पोलिसांना अनेक धागेदोरे हाती लागू शकतात.

Sudarshan Ghule l डीवायएसपी अनिल गुजर यांनी दिली माहिती :

दरम्यान, कोर्टात युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी सांगितलं आहे की, सुदर्शन घुले याने हत्येच्या काही वेळ आधी अवादा या कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी केली होती. मात्र त्यानंतर त्याला मारहाण झाली होती.

मात्र यानंतर सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोग मधील लोकांनी देखील त्याला मारहाण केली होती. मात्र त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून आरोपींनी त्यांना जबरदस्त मारहाण केली, त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डीवायएसपी अनिल गुजर यांनी दिली आहे.

News Title : Sudarshan Ghule Sudhir Sangle remanded to 14 days police custody 

महत्त्वाच्या बातम्या-

सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जायला पैसे ‘या’ व्यक्तीने पुरवले!

संतोष देशमुखांच्या भावाला मोठा संशय; “आरोपींना आश्रय देणारा हा…”

“यांच्या बापाचा बाप आला तरी आम्ही…”; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेच्या मागील 10 वर्षाच्या गुन्ह्यांची यादी समोर!

घुले अन् सांगळेचा ठावठिकाणा कसा लागला?, सरपंच हत्येमागील मास्टरमाईंड दुसराच?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now