चाहत्यांना धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलपूर्वीच ‘या’ स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

On: March 5, 2025 1:18 PM
Steve Smith Announces Retirement from ODI Cricket
---Advertisement---

ODI cricket | भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. आता टीम इंडिया थेट फायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा पराभव एका खेळाडूला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) तडकाफडकी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आलं होतं. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने 4 पैकी 1 सामना जिंकला तर दोन सामन्यात पावसाने अडथळा आणल्याने ते सामने रद्द झाले.

ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर स्मिथने निवृत्ती जाहीर केली आहे.  आज 5 मार्च रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्यांच्या सोशल मीडियावरून ही माहिती चाहत्यांना दिली.

स्टीव्ह स्मिथची वनडे कारकीर्द:

  • सामने खेळले: 170
  • धावा: 5,800
  • सरासरी: 43.28
  • शतके: 12
  • अर्धशतके: 35

स्टीव्ह स्मिथ झाला भावुक

स्मिथने 2010 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आपल्या कारकिर्दीत दोन वेळा विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. “हा एक अद्भुत प्रवास होता आणि मी त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. खूप छान क्षण आणि अद्भुत आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक मोठी कामगिरी होती आणि हा प्रवास शेअर करण्यासाठी अनेक अद्भुत सहकारी होते.”, असं स्मिथने म्हटलंय.

Title : Steve Smith Announces Retirement from ODI Cricket

 

Join WhatsApp Group

Join Now