SRH vs LSG l आयपीएल 2025 चा सातवा सामना गुरुवारी, 27 मार्च रोजी सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात रंगणार आहे. या सामन्यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे कारण हैदराबादचा फलंदाजी फॉर्म धडाकेबाज असून लखनौला पहिल्या पराभवानंतर विजयाची नितांत आवश्यकता आहे.
सामन्याचा तपशील – कुठे, कधी, किती वाजता? :
सामन्याची तारीख: 27 मार्च 2025, गुरुवार
सामन्याचा वेळ: सायंकाळी 7:30 वाजता (टॉस 7:00 वाजता)
स्थळ: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
टीव्हीवर लाइव्ह पाहण्यासाठी: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
मोबाईल/ऑनलाइन स्ट्रीमिंग: जिओ सिनेमा आणि हॉटस्टार
SRH vs LSG l SRH चे त्रिकुट लखनौसाठी धोकादायक :
हैदराबाद संघाने यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात करत राजस्थान रॉयल्सविरुद्ध 286 धावांचा डोंगर उभा केला होता. यावेळी संघाने 300 चा टप्पा गाठण्याची शक्यता निर्माण केली होती. हैदराबादकडे ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशन हे स्फोटक फलंदाज आहेत आणि हे त्रिकुट लखनौच्या गोलंदाजांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
लखनौचा संघ जर हे त्रिकुट लवकर बाद करण्यात यशस्वी झाला, तर सामन्याची दिशा बदलू शकते. अन्यथा, हैदराबाद पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभी करू शकते.
लखनौला ‘कमबॅक’ची गरज :
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौने पहिल्या सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यामुळे त्यांना हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी गोलंदाजीत अधिक सातत्य दाखवावं लागेल. रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर आणि शाहबाज अहमद यांच्याकडे फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल.
त्याचबरोबर निकोलस पूरन, एडन मार्कराम आणि मिचेल मार्श यांच्यावर लखनौच्या फलंदाजीची जबाबदारी असेल. हैदराबादसारख्या फॉर्मात असलेल्या संघाविरुद्ध विजय मिळवणं सोपं नसेल, पण लखनौला संधी आहे.
संभाव्य प्लेइंग XI :
हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स (कर्णधार), मोहम्मद शमी, हर्षल पटेल, ॲडम झाम्पा, राहुल चहर, सिमरजीत सिंग
लखनौ: ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, मयंक यादव, अर्शिन कुलकर्णी, शाहबाज अहमद, आवेश खान






