Sreeleela Viral Photo | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रीलीला हिचा कथित बाथरूम सेल्फी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा फोटो खरा नसून AI (Artificial Intelligence) द्वारे तयार केलेला बनावट फोटो असल्याचा खुलासा स्वतः श्रीलीलानं केला आहे. या प्रकारामुळे ती अत्यंत व्यथित असून, तिनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत सर्व युजर्सना विनंती केली आहे.
सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचा गंभीर प्रश्न :
सध्या सोशल मीडियावर AI-जनरेटेड फोटो आणि व्हिडीओंचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः महिला सेलिब्रिटींचे बनावट, आक्षेपार्ह फोटो व्हायरल होण्याच्या घटनांमुळे ऑनलाईन नीतिमत्ता आणि प्रायव्हसी यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रीलीलाचा व्हायरल होत असलेला बाथरूम सेल्फीही याच प्रकारातील असून, या फोटोशी आपला कोणताही संबंध नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे. (Bathroom Selfie Controversy)
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीलीलानं सोशल मीडियावर लिहिलं आहे, “मी हात जोडून सर्वांना विनंती करते की, कोणत्याही प्रकारच्या AI-जनरेटेड मूर्खपणाला पाठिंबा देऊ नका. वापर आणि गैरवापर यामध्ये मोठा फरक असतो. तंत्रज्ञान जीवन सोपं करण्यासाठी आहे, ते उद्ध्वस्त करण्यासाठी नाही.”
Sreeleela Viral Photo | महिलांच्या सन्मानाबाबत ठाम भूमिका :
आपल्या पोस्टमध्ये पुढे ती म्हणते, “या जगातील प्रत्येक मुलगी कोणाची तरी मुलगी, बहीण, नात किंवा मैत्रीण असते, मग ती कोणताही व्यवसाय करत असो. आम्ही अशा इंडस्ट्रीचा भाग आहोत जी आनंद पसरवण्यावर विश्वास ठेवते. आम्हाला सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे.” (Sreeleela AI Generated Images)
श्रीलीलानं हेही मान्य केलं की, ऑनलाईन काय सुरू आहे याची तिला जाणीव आहे, मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक गोष्टी लगेच लक्षात येत नाहीत. “माझ्या मित्रांनी आणि शुभचिंतकांनी मला हे प्रकार लक्षात आणून दिले, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मी आयुष्य सकारात्मक दृष्टीने पाहते, पण असे प्रकार खूप निराशाजनक आहेत. माझे काही जवळचे मित्रही अशाच घटनांना सामोरे जात आहेत,” असं ती म्हणाली.






