Farmer Good News l राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क तब्बल 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील सोयाबीन उत्पादकांना होणार आहे. याशिवाय सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णय घेतला होता. अशातच आता सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
सोयाबीन उत्पादकांना मोठा फायदा होणार :
राज्यात सोयाबीनची पेरणी ही 52 लाख हेक्टर पेक्षा जास्त असल्याने व यंदाच्या वर्षी पाऊस देखील व्यवस्थित झाला असल्याने सोयाबीनचे उत्पन्न देखील जास्त प्रमाणात निघणार आहे. अशावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे वारंवार प्रयत्न करीत असून त्या दृष्टिकोनातून त्यांनी केंद्र शासनाकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी अशी मागणी देखील होती.
याशिवाय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खाद्यतेल, सोया मिल्क आणि सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे व यासोबतच सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटल मागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे अशा मागण्या देखील त्यांनी केल्या होत्या.
Farmer Good News l खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवली :
मात्र कृषी मंत्र्यांनी केलेल्या मागण्यांना आता यश आले असून केंद्र सरकारने मागील आठवड्यातच सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाद्यतेलावरील आयात शुल्क ही तब्बल 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याशिवाय केंद्राकडे 3 पैकी 2 मागण्या देखील सरकारने मान्य केल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
News Title : Soyabeans Import Duty
महत्त्वाच्या बातम्या-
ईद-ए-मिलादची सुट्टी 16 ऐवजी ‘या’ तारखेला मिळणार; सरकारने केला मोठा बदल
सोन्याची भरारी! हजारो रुपयांनी महागलं; काय आहेत आजचे भाव?
आजपासून ‘इतक्या’ दिवस बँका बंद राहणार; तुमच्या शहराचं नाव आहे का तपासा?
विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ 18 जागांवर काँग्रेस आग्रही, पाहा यादी!






