Sonakshi Sinha Wedding | बॉलिवुडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बालसोबत लग्न बंधनात अडकली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या स्टार कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्नाची नोंदणी केली.
लग्नानंतर सोनाक्षीने आपल्या जवळच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले. या रिसेप्शनमध्ये सोनाक्षीने लाल रंगाची साडी घातली होती. जहीर आणि सोनाक्षी यांचे लग्नातील आणि रिसेप्शनमधील फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये सोनाक्षीने घातलेली लाल रंगाची साडी तर अधिकच चर्चेत आली आहे.
सोनाक्षीने घातलेली ‘चांद बुटा’ साडी चर्चेत
सोनाक्षीने रिसेप्शनला नेसलेल्या लाल रंगाच्या साडीची किंमत थक्क करणारी आहे. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्रीने बोल्ड रेड शेडची ‘चांद बुटा’ ब्रोकेड साडी परिधान केली होती. ज्याची किंमत 79,800 रुपये आहे. या साडीमध्ये तिचे सौंदर्य अजूनच खुलून आले होते.
लग्नात देखील सोनाक्षीने अगदी साधा लुक केला होता. लग्नाची नोंदणी करताना (Sonakshi Sinha Wedding) तिने आई पूनम सिन्हाची ऑफ व्हाईट साडी परिधान केली होती. तर, रिसेप्शनला सोनाक्षीने लाल रंगाची साडी, चूडा आणि सिंदूर लावले होते.
सोनाक्षीने 23 जूनलाच लग्न का केलं?
दरम्यान, नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर सोनाक्षीने (Sonakshi Sinha Wedding) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने 23 जून 2017 ही तारीख खूप स्पेशल असल्याचे सांगितले. तसंच सोनाक्षीने 23 तारखेलाच लग्न करण्याचा निर्णय का घेतला, याबाबतही खुलासा केला आहे.
View this post on Instagram
सोनाक्षीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (23.06.2017) आम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले होते जे सर्वात सुंदर आहे. आज त्या प्रेमाने आम्हाला सगळ्या अडचणींतून मार्गदर्शन केले आहे. हा सुंदर क्षण इथपर्यंत पोहोचला आहे जिथे आम्ही दोन्ही कुटुंबीयांच्या आणि दोन्ही देवांच्या आशिर्वादाने आता पती-पत्नी झालो आहोत.’ सोनाक्षीची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.
News Title- Sonakshi Sinha Wedding silk saree price
महत्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
पुणे ड्रग्जच्या विळख्यात, सोशल मीडियावर ड्रग्ज तयार करतानाचा व्हिडीओ व्हायरल!
पुण्यात ड्रग्ज प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
काळजी घ्या! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
पार्किंगमध्ये कार जास्त वेळ पार्क करताय? तर होऊ शकतं मोठं नुकसान






